हैदराबाद - Directors day 2024 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत बनणारे चित्रपटांकडे एक नजर टाकली तरी आपल्याला त्यातली भव्यता, वास्तव दर्शन, कल्पना विलास, सुंदर लोकेशन्स, अॅक्शन्स, रोमँटिक गाणी अशी मनोरंजनाची हमी आपल्याला मिळत असते. साऊथचे महान दिग्दर्शक दासरी नारायण राव यांचे दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशामध्ये मोठं योगदान आहे. त्यांचा आज 4 मे रोजी होणारी पुण्यातिथी 'डायरेक्टर्स डे' म्हणून साजरा केली जाते. दिग्दर्शक दसरी यांचा जन्म 4 मे 1947 रोजी झाला आणि 30 मे 2017 रोजी हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले. दिग्दर्शक असण्याबरोबरच ते पटकथा लेखक, अभिनेता, निर्माता, गीतकार आणि राजकारणी देखील होते. या निमित्ताने आपण साऊथ चित्रपटसृष्टीतील अशा दिग्दर्शकांबद्दल बोलणार आहोत ज्यांचा एकही चित्रपट फ्लॉप झाला नाही.
- एस.एस. राजामौली
'बाहुबली' फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आपल्या 23 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत 12 चित्रपट केले आहेत आणि त्यांचे 12 पैकी 12 चित्रपट जगभरात रेकॉर्डब्रेक झाले आहेत.
स्टुडंट नंबर 1 (2001)
सिंम्हाद्री (२००३)
साई (2004)
छत्रपती (२००५)
विक्रमनायडू (2006)
यामाडोंगा (2007)
मगधीरा (२००९)
मर्यादा रमणा (२०१०)
द फ्लाय ( मख्खी ) (२०१२)
बाहुबली- द बिगिनिंग (2015)
बाहुबली- द कन्क्लूजन (2017)
आरआरआर (२०२२)
महेश बाबूबरोबर आगामी चित्रपट- SSMB 29
- अरुणकुमार ऊर्फ अॅटली
दक्षिण चित्रपटसृष्टीतील युवा दिग्दर्शक असलेल्या अॅटली याने 2013 साली राजा राणी या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर तो सतत यशाची शिखरे चढत आला आहे.
राजा राणी - (2013)
थेरी (2016)
मेर्सल (2017)
बिगिल (२०१९)
जवान (२०२३)
- लोकेश कानगराज
अॅटलीप्रमाणेच तमिळ चित्रपट दिग्दर्शक लोकेश कनागराज यांनीही 2016 मध्ये पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता.
अविवियल 2016)
मनाराम (२०१७)
कैदी (२०१९)
मास्टर (२०२१)
विक्रम (२०२२)
लिओ (२०२३)
आगामी चित्रपट- रजनीकांतबरोबर 'कुली'.
- प्रशांत नील
केजीएफ फेम दिग्दर्शक देखील 10 वर्षे चित्रपटसृष्टीत आहे आणि या 10 वर्षात त्यानं चार ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
उग्रम (२०१४)
केजीएफ चॅप्टर 1 (2018)
केजीएफ चॅप्टर 2 (२०२२)
सालार भाग १ - सीझफायर (२०२३)
आगामी चित्रपट
सालार भाग २ - शौर्यंग पर्व
केजीएफ चॅप्टर 3
- संदीप रेड्डी वंगा
2023 मधील सर्वात मोठा मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट अॅनिमलचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी अवघ्या 7 वर्षात दिग्दर्शक म्हणून मोठे यश संपादन केले आहे.
अर्जुन रेड्डी (2017)
कबीर सिंग (२०१९)
अॅनिमल (२०२३)
हेही वाचा -
- अमिताभ आणि रजनीकांतने सुरू केले 'वेट्टियाँ'चे शूटिंग, 'बिग बी'सह 'थलैयवा' ३३ वर्षांनंतर एकत्र - Thalaiyava with Big B
- 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या कलाकारांची गुरचरण सिंग बेपत्ता प्रकरणी होणार चौकशी - gurucharan singh missing case
- निक जोनासची प्रकृती चिंताजनक, व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची मागितली माफी... - nick jonas apologises to fans