मुंबई - Krushna Abhishek Comedy Circus Fees : कपिल शर्माच्या शोमध्ये कृष्णा अभिषेकनं कधी सपना दीदी बनून तर कधी लोकप्रिय कलाकारांची नक्कल करून प्रेक्षकांना खूप हसवलं आहे. कृष्णा अभिषेकला टीव्ही इंडस्ट्रीत पहिला ब्रेक 'कॉमेडी सर्कस'नं दिला होता. या शोमधल्या कॉमेडीमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. या शोमुळे त्याला टीव्ही इंडस्ट्रीत एक नवी ओळख मिळाली. कृष्णा अभिषेकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं खुलासा केला की पैशासाठी कॉमेडी सर्कस साइन केलं होतं आणि तिथे त्याला प्रती एपिसोड 1.5 लाख मिळत होते. तो दिवसाला 3 लाख रुपये कमवत होता. कृष्णा अभिषेकनं अलीकडेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या टीव्ही प्रवासाबद्दल मोकळेपणाने काही गोष्टी सांगितल्या.
कृष्णा अभिषेकने सांगितला टीव्ही इंडस्ट्रीतला प्रवास : टीव्ही प्रवासाबद्दल बोलताना त्यानं म्हटलं, ''मी फक्त पैशासाठी कॉमेडी सर्कस साइन केलं होतं. मी त्यानंतर खूप खुश होतो. मला एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये मिळत होते. गोविंदाचा भाचा असल्यानं मला तिथे खूप आदर दिला जात होता. मी दिवसाला 3 लाख रुपये कमावतो हे पाहून मला आश्चर्य वाटलं. पुढं कृष्णानं सांगितले की, ''त्यावेळी मी भोजपुरी चित्रपटात काम करायचो. मला एका चित्रपटासाठी 3 लाख रुपये मानधन देत मिळत होतं. मी 30 दिवस शूटिंग करायचो, त्यानंतर मला इतके पैसे मिळत होते. भोजपुरी चित्रपटांमधील कामाचा मला खूप अभिमान वाटतो."
कृष्णा अभिषेकचे आगामी प्रोजेक्ट्स : एक प्रसंग सांगताना कृष्णाने म्हटलं की, त्यानं एक चित्रपट केला होता, ज्याचे त्याला अनेक सीन्स समजले नाहीत आणि बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट सुपरहिट झाला. कृष्णा अभिषेक पुन्हा एकदा कपिल शर्माबरोबर नेटफ्लिक्सवरील एका कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे. हा शो 30 मार्चपासून प्रसारित होणार आहे. कृष्णा हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता पुढं तो 'वेलकम टू जंगल' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अक्षय कुमार, दिशा पटानी, अनिल कपूर, संजय दत्त आणि इतर कलाकार असणार आहेत.
हेही वाचा :