मुंबई - Kolkata Doctor Rape Murder Case : पश्चिम बंगालमधील एका 31 वर्षीय ट्रेनी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येनं संपूर्ण देश हादरला आहे. पीडितेच्या पोस्टमार्टम अहवालानं संपूर्ण देशाला दु:ख झालंय. आता या प्रकरणी सोशल मीडिया यूजर्सन कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये निर्भयाच्या घटनेनंतरही महिलांवरील अत्याचारात कोणताही बदल झालेला नाही, असं नमूद करण्यात आलं आहे. आलिया व्यतिरिक्त साऊथ सेलिब्रिटींनी या घटनेच्या क्रूरतेविरोधात न्यायाची मागणी केली आहे.
आलिया भट्टनं दिली प्रतिक्रिया : बुधवारी, 14 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलियानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, यामध्ये तिनं लिहिलं, "आणखी एक क्रूर बलात्कार. महिला कुठेही सुरक्षित नाहीत याची जाणीव करून देण्याचा आणखी एक दिवस. निर्भया घटनेला एक दशकाहून अधिक काळ लोटला आहे, तरीही फारसा बदल झालेला नाही याची आठवण करून देणारा आणखी एक भयानक अत्याचार."
उपासना कामिनेनी केली शेअर पोस्ट : त्याचबरोबर साऊथचा सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनीनं कोलकाता घटनेवर आवाज उठवला आहे. तिनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. यामध्ये तिनं लिहिलं की, "मानवतेचा आदर न केल्यानं द्वेष निर्माण होतो. महिला डॉक्टवर असे अत्याचार होत असल्याचं पाहणं हे धक्कादायक आहे. हे कोणीही सहन करू नये. आपल्या समाजात अजूनही रानटीपणा अस्तित्वात असताना आपण खरोखर कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य साजरे करत आहोत? हे मानवीय नाही." उपासना पुढं लिहिलं, "भारतातील आरोग्यसेवेचा कणा महिला आहेत, ज्यात 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी आहेत. एका अभ्यासानुसार असं दर्शविते की, महिला हेल्थकेयर प्रोवाइडर त्यांच्या रुग्णांबरोबर अधिक वेळ घालवतात, रुग्णांची अधिक काळजी घेतात आणि त्या विश्वास निर्माण करण्यात अनेकदा चांगल्या असतात.त्या आपल्या आरोग्य सेवा प्रणालीसाठी आवश्यक आहेत."
स्टार्सनं दिल्या प्रतिक्रिया : याशिवाय तिनं पुढं म्हटलं , " आरोग्य सेवेमध्ये, महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे, प्रत्येक स्त्रीची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी ठोस उपायांची आवश्यकता आहे. एकत्र येऊन आपण बदल घडवून आणू शकतो. मलायका अरोरा, आयुष्मान खुराना, ट्विंकल खन्ना, राशि खन्ना, क्रिती खरबंदा, परिणीती चोप्रा, विजय वर्मा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कोलकाता डॉक्टर रेप हत्येप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :