ETV Bharat / entertainment

किरण रावनं 'लाल सिंग चड्ढा'च्या बॉक्स ऑफिसवरील निराशाजनक कामगिरीबद्दल केला खुलासा - किरण राव

Kiran Rao: 2022मध्ये प्रदर्शित झालेला 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यावर किरण रावनं 'लापता लेडीज'च्या प्रमोशनदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे.

Kiran Rao
किरण राव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 1:22 PM IST

मुंबई - Kiran Rao: अभिनेता आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव सध्या तिच्या आगामी 'लापता लेडीज ' चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. तिला या चित्रपटासाठी आमिर खाननं पाठिंबा दिला आहे. आमिर खान आणि किरण राव 'लापता लेडीज ' चित्रपटाच्या क्रूबरोबर सध्या प्रमोशन करताना दिसत आहेत. 'लापता लेडीज चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटाचा ट्रेलर अनेकांना आवडला आहे. नुकत्याचं झालेल्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये संवादादरम्यान किरणनं 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाच्या फ्लॉपवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 2022 रोजी प्रदर्शित झालेला आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

'लाल सिंग चड्ढा' चित्रपटावर किरण दिली प्रतिक्रिया : चित्रपटाच्या अपयशावर भाष्य करताना किरण म्हटलं, 'हे खरोखर निराशाजनक आहे, कारण जेव्हा तुम्ही काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करता आणि ते काम बरोबर होत नाही, यानंतर वाईट वाटते. 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाबाबतही असेच घडले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. या चित्रपटाच्या खराब प्रदर्शनाचा परिणाम केवळ आमिरवरच नाही तर संपूर्ण टीमवर झाला. पुढं तिनं सांगितलं, 'हा चित्रपट आमिरचा 'ड्रीम प्रोजेक्ट' होता. या चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी आमिरनं खूप मेहनत घेतली होती, मात्र या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळू शकला नाही. यानंतर मी आमिरला हे सत्य स्वीकारण्यास सांगितले.''

'लापता लेडीज 'हा चित्रपट कधी होणार प्रदर्शित : किरण रावच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, 'लापता लेडीज' हा एक आगामी कॉमेडी-ड्रामा आहे, जो आमिर खान प्रॉडक्शन आणि किंडलिंग प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित झाला आहे. या चित्रपटाची कहाणी पुरस्कार विजेते बिप्लब गोस्वामी यांच्यावर आधारित आहे. 'लापता लेडीज'ची कहाणी आणि संवाद स्नेहा देसाई आणि दिव्यानिदी शर्मा यांनी लिहिलं आहेत. हा चित्रपट 1 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. जिओ स्टुडिओच्या माध्यमातून हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.

हेही वाचा :

  1. 'तेरी बातों में उल्झा जिया'च्या कमाईत वाढ ; रिलीच्या दुसऱ्या दिवशी केली 'इतकी' कमाई
  2. आदर्श गौरवने 'एलियन्स'च्या शूटिंगला केली सुरुवात, सहकाऱ्यांसह चाखला स्थानिक जेवणाचा स्वाद
  3. लेकीचं फेक अकाउंट बनवणाऱ्याला नम्रता शिरोडकरनं दिला सज्जड इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.