ETV Bharat / entertainment

'गेम चेंजर' निर्मात्याकडून पोस्टर रिलीज, कियारा अडवाणीला शुभेच्छा देत उघड केले 'ते' गुपीत - KIARA ADVANI - KIARA ADVANI

Kiara Advani Birthday: कियारा अडवाणीचा आज 31 जुलैला वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी, राम चरण स्टारर 'गेम चेंजर'च्या निर्मात्यांनी तिचं पोस्टर शेअर करून तिला वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Kiara Advani Birthday
कियारा अडवाणीचा वाढदिवस (गेम चेंजर कियारा अडवाणीचं पोस्टर (@srivenkateswaracreations Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 1:26 PM IST

मुंबई -Kiara Advani Birthday: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आज 31 जुलै रोजी 33 वर्षांची झाली आहे. या खास प्रसंगी तिला तिचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील स्टार्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, तिला आगामी 'गेम चेंजर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 'गेम चेंजर' चित्रपटातील कियाराच्या व्यक्तिरेखेबद्दल एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. कियाराच्या वाढदिवशी, निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. चित्रपटातील तिच्या पात्राचं नाव उघड केलंय. रिलीज केलेलं पोस्टर खूप आकर्षक दिसत आहे. यावर कियाराचे चाहते कमेंट्स करून या चित्रपटाबद्दल उत्सुक असल्याचं सांगताना दिसत आहेत.

'गेम चेंजर'मधील कियारा अडवाणीचं पोस्टर : 'गेम चेंजर'च्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर रिलीज करून चित्रपटाच्या रिलीजबाबत अपडेट दिली नाही. या चित्रपटात कियारा अडवाणी व्यतिरिक्त साऊथ स्टार राम चरणदेखील आहे. 'गेम चेंजर' चित्रपटातील कियाराचं नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "गेम चेंजर' टीमच्या वतीनं आमची जाबिलम्मा उर्फ ​​कियारा अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तिची वाइब्रेंट एनर्जी लवकरच तुमच्या हृदयाला मोहित करेल." 'गेम चेंजर' हा आगामी राजकीय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस शंकर यांनी केलं आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

'गेम चेंजर' चित्रपटाबद्दल : या चित्रपटात अंजली, एसजे सूर्या, श्रीकांत, जयराम, सुनील आणि समुथिराकणी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते दिल राजू आहे.'गेम चेंजर' चित्रपटाचं संगीत थमन एस यांनी दिलं आहे. या चित्रपटाची कहाणी कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिलं आहे. 'गेम चेंजर' चित्रपटाचं बजेट 240 कोटी आहे. श्री वेंकटेश्वर क्रिएशन्स निर्मित हा चित्रपट 2024मध्ये रिलीज होणार आहे. मात्र आतापर्यत या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही. 'गेम चेंजर' चित्रपटामध्ये राम चरण हा आयएएसच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'डॉन 3'मध्ये रणवीर सिंगबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.

हेही वाचा :

  1. सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहतीला 50 लाखाचा झटका, कियारा अडवाणीमुळे अभिनेत्याचा जीव धोक्यात - Sidharth Malhotra
  2. कार्तिक आर्यननं सारा अली, कियाराला नाही तर विद्या बालनला म्हटलं 'फेव्हरेट' अभिनेत्री - Kartik Aaryan Favourite Co Star
  3. कान्सच्या रेड कार्पेट पदार्पण करण्यापूर्वी थाय हाय स्लिट गाऊनमध्ये झळकली कियारा अडवाणी - Cannes Film Festival 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.