ETV Bharat / entertainment

बहिण इसाबेलसह कतरिना कैफ मुंबईत परतली, ट्रेंडी लूकमध्ये दोघींनीही वेधले लक्ष - Katrina Kaif with Sister Isabelle

Katrina Kaif with Sister Isabelle : कतरिना कैफ तिची बहीण इसाबेल कैफला बरोबर शहरात परतली आहे. दोघीही मंगळवारी सकाळी विमानतळावर त्यांच्या स्टायलिश लूकमध्ये पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या.

Katrina Kaif with Sister Isabelle
बहिण इसाबेलसह कतरिना कैफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 4:58 PM IST

मुंबई - Katrina Kaif with Sister Isabelle : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्याची केवळ लोकप्रिय अभिनेत्रीच नाही तर ती अनेकांच्या हृदयावर राज्य करत आहे. 'टायगर 3' मध्ये झळकलेली कतरिना तिची बहीण इसाबेल कैफसह मुंबई विमानतळावर सुंदर दिसत होती. ती मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली. दरम्यान, कतरिना कैफने अलीकडेच तिची बहीण इसाबेल कैफसह दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) सामन्याला हजेरी लावली होती. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्सचा सामना झाला. स्पोर्टिंग टीमच्या जर्सी घातलेल्या कॅटरिना आणि इसाबेल यांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहून यूपी वॉरियर्स टीमचे मनोबल वाढवले.

पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कतरिना तिच्या बहिणीसह स्टाईलमध्ये चालताना दिसते. काळ्या पोल्का पॅटर्नसह पांढऱ्या गाऊनमध्ये अभिनेत्री कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. तिने ते काळ्या लेदर जॅकेट, काळे बूट आणि सनग्लासेसह मॅचिंग केले होते. दुसरीकडे, इसाबेल कैफने निळ्या रिप्ड जीन्स आणि ग्रे रंगाच्या हुडीसह ट्रेंडी दिसत होती. कतरिना तिची कार पोहोचताच एक चाहता आला आणि त्याने तिला आकर्षक गुलाब भेट म्हणून दिला. यावर हसत कतरिनाने त्याचा स्वीकार केला आणि ती गाडीकडे निघून गेली.

कतरिना आणि तिचा नवरा अभिनेता विकी कौशल हे अलिकडेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या जामनगर, गुजरातमध्ये पार पडलेल्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये दिसले होते. यापूर्वी विकीने कतरिनाशी लग्न केल्यानंतर त्याचे आयुष्य कसे बदलले याबद्दल खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की त्याच्या पत्नीने त्याच्या जीवनात स्थैर्य आणले आहे. लग्नानंतर त्याच्यात खूप बदल झाल्याचे आणि तो आता पहिल्यापेक्षा अधिक परिपक्व झाल्याचे विकीने सांगितले होते.

व्यावसायिक आघाडीवर, कतरिना जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या श्रीराम राघवन दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट 'मेरी ख्रिसमस'मध्ये विजय सेतुपतीच्या बरोबर दिसली होती. हा 2024 मधील पहिला मोठा बॉलीवूड चित्रपट होता आणि त्याला समीक्षकांची व्यापक प्रशंसा मिळाली. त्याआधी ती 'टायगर 3' मध्ये दिसली होती. यामध्ये सलमान खान आणि इमरान हाश्मी होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती.

अभिनेत्री कतरिना कैफ आगामी काळात फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे यामध्ये आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा देखील दिसणार आहेत. मात्र, शूटिंग शेड्यूलला लागत असलेल्या विलंबामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. आयुष शर्मा अभिनीत 'रुस्लान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ; पाहा व्हिडिओ
  2. Krystyna Pyszkova : मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्कोव्हाला 'या'मुळे आवडतो शाहरुख खान
  3. सनी देओल स्टारर 'द हिरो'चे निर्माते धीरजलाल शाह यांचं अवयव निकामी झाल्यानं निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.