मुंबई : बी-टाऊनच्या अभिनेत्रींनी रविवारी 20 ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटामाटात करवा चौथचा सण साजरा केला. आता सोशल मीडियावर सुंदर क्षणाचे फोटो या स्टार्स अभिनेत्रींनी शेअर केले आहेत. पारंपारिक पेहरावापासून तर पतीबरोबर साजऱ्या होणाऱ्या सणाची खास झलक पाहिल्यानंतर अनेकजण या अभिनेत्रींचे कौतुक करत आहेत.
प्रियांका चोप्रा : प्रियांका अनेक वर्षांपासून लॉस एंजेलिसमध्ये राहत आहे. परदेशात राहिल्यानंतर ही देसी गर्ल आपल्या देशाची संस्कृती विसरलेली नाही. प्रियांका दरवर्षी निकसाठी उपवास ठेवते. लग्न झाल्यापासून ती त्याच्याबरोबर हा सण साजरा करत आहे. प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोत ती लाल दुपट्टा, सिंदूर आणि बांगड्यांसह मॅरून हुडीमध्ये दिसत आहे. पहिल्या फोटोत चंद्राला पाहिल्यानंतर निक प्रियांकाला पाणी पाजताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत प्रियांका नोट वाचत आहे. याशिवाय प्रियांका निकसह आपल्या हातावर काढलेली मेंहदी तिसऱ्या फोटोत तिच्या चाहत्यांना दाखवताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना प्रियांकानं यावर लिहिलं, 'सर्वांना... करवा चौथच्या शुभेच्छा आणि हो मी फिल्मी आहे.' फोटोमध्ये दोघेही एकत्र सुंदर दिसत असून आता अनेक चाहते, या जोडप्याचे कौतुक करत आहेत.
कतरिना कैफ : कतरिना कैफनं रविवार, 20 ऑक्टोबर रोजी करवा चौथ सेलिब्रेशनचे सुंदर फोटो शेअर केले आहेत, यामध्ये ती तिच्या सासूबरोबर सुंदर क्षण घालवताना दिसत आहे. फोटोत तिची सासू वीणा कौशल, पती विकी कौशल आणि इतर कुटुंबातील सदस्य दिसत आहेत. पोस्टच्या शेवटच्या फोटोत कतरिनाची बहीण इसाबेल कैफ, दीर सनी आणि सासरे शाम कौशल हे देखील आहेत. याशिवाय या पोस्टद्वारे कतरिनानं तिच्या चाहत्यांना करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
परिणीती चोप्रा : राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा त्यांनी करवा चौथ मोठ्या थाटामाटात साजरा केला. इंस्टाग्रामवर राघवबरोबरचे फोटो शेअर करताना परीनं लिहिलं, 'माझा चंद्र आणि माझे तारे... माझ्या आयुष्यातील प्रेमाला करवा चौथच्या शुभेच्छा.' व्हायरल झालेल्या फोटोत हे जोडपे हात धरलेले दिसत आहे. पिंक कलरच्या पलाझो सूटमध्ये परिणीती सुंदर दिसत आहे. दरम्यान, राघव चड्ढा यांनी हिरव्या रंगाची एथनिक ड्रेस परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. याशिवाय हे फोटो राघव यांनी देखील शेअर केली आहेत. या पोस्टवर त्यांनी परिणीतीसाठी लिहिलं आहे की, 'तू एवढ्या ताकदीनं आणि आस्थेनं दिवसभर उपवास करतेस याचं मला खूप आश्चर्य वाटते. या दिवसात तुम्ही सूर्योदयापासून तर चंद्रोदयापर्यंत खूप प्रेम आणि समर्पण दाखवले आहे. मी तुमच्यामुळे खूप प्रभावित झालो आहे. हे मला आश्चर्यचकित करते की, मी अशा प्रकारची निःस्वार्थता कशी जुळवू शकेन. करवा चौथच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय पारू.'
करवा चौथ : याशिवाय शिल्पा शेट्टी, शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत, मौनी रॉय, क्रिती खरबंदा, रकुल प्रीत सिंग, आणि इतरांनी देखील करवा चौथचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यांनी देखील त्यांच्या चाहत्यांना या शुभ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता या स्टार्स अभिनेत्रींचे फोटो चाहत्यांना खूप आवडत असल्याचे दिसत आहेत. या फोटोंवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा :