मुंबई - karva chauth 2024: देशभरात आज 20 ऑक्टोबर रोजी करवा चौथ साजरा केला जात आहे. या शुभ सणाचा आनंद चित्रपटसृष्टीत दिसून येत आहे. परिणीती चोप्रा, शिल्पा शेट्टी, सोनम कपूरसह अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या करवा चौथची झलक शेअर केली आहे. त्यांचे सोशल मीडियावर मेहंदीपासून तर मॉर्निंग सरगीपर्यंतचे फोटो आता पाहायला मिळत आहेत.
सोनम कपूर : अभिनेत्री सोनम कपूरनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत सोनमच्या हातावर सुंदर मेहंदी सजवलेले दिसत आहे. याशिवाय सोनमच्या हातावर तिचा पती आनंद आणि मुलगा वायु यांची नावेही लिहिली आहेत. एका व्हिडिओ क्लिपमध्ये सोनम आपल्या चाहत्यांना तिच्या हातावरची मेंहदी दाखविताना दिसत आहे.
परिणीती चोप्रा : परिणीती चोप्रा नुकतीच पती राघव चढ्ढाबरोबर करवा चौथ साजरा करण्यासाठी नवी दिल्लीत पोहोचली आहे. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर हातावर मेहंदी काढल्याचा फोटो शेअर केला आहे. तिच्या हातावर हार्टच्या आकाराची मेहंदी काढली आहे. याशिवाय तिनं राघव चढ्ढा आणि घराची झलक देखील चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यानंतर परीनं एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये ती आराम खुर्चीवर बसून असल्याची दिसत आहे, यानंतर व्हिडिओमध्ये राघव चढ्ढा हे म्हणतात की, "वेलकम होम"
शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टीनेही करवा चौथवर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये 'सर्गी' या पदार्थाची झलक दिसत आहे. सुंदर सजवलेली थाळी, सजवलेली गाळणी, मेंदी, हिरव्या बांगड्या आणि पारंपारिक शगुन लिफाफा, कपडे, दागिने आणि विविध प्रकारचे गोड आणि स्नॅक्स या व्हिडिओत असल्याचे दिसत आहेत. यानंतर तिनं तिच्या हातावर आणि पायवर काढलेली मेंहदी तिच्या चाहत्यांना दाखवलेली आहे.
भाग्यश्री : भाग्यश्रीनं जवळच्या मैत्रणीच्या मेहंदी पार्टीची क्लिप शेअर केली आहे. यात तिनं तिच्या मेहेंदीच्या डिझाईनची झलक दाखवत पार्टीचे मजेदार क्षण शेअर केले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'गँगबरोबर मेहंदी पार्टी. अरे खूप मजा आली, आम्ही खूप खाल्ले आणि नाचलो, आम्ही स्वतःमध्ये हरवून बसलो.'