ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यननं केलं सलग 18 तास शूटिंग, 'भूल भुलैया 3'वर व्हिडिओ शेअर - Kartik Aaryan - KARTIK AARYAN

Kartik Aaryan 'Bhool Bhulaiyaa 3': कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच त्यानं सेटवरील एक नवीन झलक शेअर केली आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन(@kartikaaryan Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 2:06 PM IST

मुंबई - Kartik Aaryan : हिंदी चित्रपसृष्टीचा अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'भूल भुलैया 3'मुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटासाठी तो खूप मेहनत घेत आहे. दरम्यान त्यानं मंगळवारी सेटवरून एक नवीन झलक शेअर केली आहे. त्यानं पोस्टमध्ये शूट 1 ते शूट 2 पर्यंतची झलक दाखवली आहे. दरम्यान पहिल्या पोस्टमध्ये त्यानं सनग्लासेस घातलेल्या इमोजीच्या मदतीनं स्वतःचा चेहरा लपवला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, "शूट 1. 'भूल भुलैया 3". याशिवाय त्यानं 8 मे रोजी सकाळी, एक ब्लॅक अँड व्हाइट पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कॉफीबरोबर त्यानं स्वतःची झलक दाखवली आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन(@kartikaaryan Instagram))
Kartik Aaryan
कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन(@kartikaaryan Instagram))
Kartik Aaryan
कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन(@kartikaaryan Instagram))

'भूल भुलैया 3' शूट : या व्हिडिओच्या पोस्टवर कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, "शूट 2, 3.29 (एम) कॉफी पण संपली." शेवटच्या पोस्टमध्ये तो शुटिंग झाल्यानंतर घरी परतत असताना दिसत आहे. कार्तिकनं कारमधून स्वत:चा एक व्हिडिओ शेअर करत यावर कॅप्शनमध्ये लिहिलं, "शूटिंगचे 18 तास संपले." कार्तिक हा सुमारे 18 तासापासून काम करत आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये तो थकल्यासारखा वाटत आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित हिट फ्रँचायझी 'भूल भुलैया'च्या तिसऱ्या भागात विद्या बालन आणि तृप्ती दिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दिवाळी 2024 च्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.

'भूल भुलैया' फ्रँचायझी : विद्या बालननं 2007 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' या सायकोलॉजिकल हॉरर-कॉमेडी चित्रपटात मंजुलिकाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटातविद्याबरोबर अक्षय कुमार आणि शाइनी आहूजा दिसले होते. दुसऱ्या भागात, कार्तिकनं तब्बू आणि कियारा अडवाणीबरोबर स्क्रीन स्पेस शेअर केली होती. दरम्यान कार्तिकच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर त्याचा 'चंदू चॅम्पियन' हा रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खाननं केलंय. चंदू चॅम्पियन'मध्ये कार्तिक एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कार्तिक दिग्दर्शक हंसल मेहताचा आगामी चित्रपट 'कॅप्टन इंडिया' आणि दिग्दर्शक अनुराग बासूच्या आगामी 'आशिकी 3' या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. प्रेग्नेंसी फेजमध्ये दीपिका पदुकोण पती रणवीर सिंगबरोबर विमानतळावर झाली स्पॉट, फोटो व्हायरल - Ranveer Singh and Deepika Padukone
  2. श्वेता तिवारीनं तिच्या थायलंडच्या सुट्टीतील हॉट फोटो केले इन्स्टाग्रामवर शेअर - shweta tiwari share hot pictures
  3. शिखर पहारियाबरोबरच्या तिरुपतीमधील लग्नाच्या अफवांवर जान्हवी कपूरनं दिली प्रतिक्रिया - janhvi kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.