ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन'चं नवीन पोस्टर रिलीज - kartik aaryan - KARTIK AARYAN

Chandu Champion New Poster : कार्तिक आर्यन अभिनीत 'चंदू चॅम्पियन'मधील नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Chandu Champion New Poster
चंदू चॅम्पियन नवीन पोस्टर ((Kartik aaryan - Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 2:51 PM IST

Updated : May 16, 2024, 3:01 PM IST

मुंबई - Chandu Champion New Poster : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'चंदू चॅम्पियन'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची आता अनेक चाहते वाट पाहात आहेत. दरम्यान 15 मे रोजी, या चित्रपटातील कार्तिकचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला होता. हे पोस्टर खूपच आकर्षक होते. आज, 16 मे रोजी कार्तिक आर्यननं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटामधील आणखी एक अप्रतिम पोस्टर शेअर करून त्याच्या चाहत्यांना भेट दिली आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन बॉक्सरच्या लूकमध्ये रिंगमध्ये उभा असलेला दिसत आहे. 'चंदू चॅम्पियन'मधील नवीन पोस्ट शेअर करताना कार्तिक यावर लिहिलं, "रिंगच्या आयुष्यात, चॅम्पियन बनण्यासाठी तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल. चॅम्पियन येत आहे."

'चंदू चॅम्पियन'मधील नवीन पोस्टर रिलीज : 'चंदू चॅम्पियन'मधील नवीन पोस्टरबद्दल बोलायचं झालं तर तो हातात ग्लोव्हज आणि दातांवर, दातांचा सेफ्टी पॅच घातलेल्या अवस्थेत दिसत आहे. याशिवाय तो या पोस्टरमध्ये खूप गंभीर भासत आहे. त्याचा हा लूक आता अनेकांना आवडतोय. 'चंदू चॅम्पियन' हा कबीर खान लिखित आणि दिग्दर्शित स्पोर्ट्स बायोग्राफीकल चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवालानं केली आहे. कार्तिक आर्यन या चित्रपटात पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकरच्या भूमिकेत दिसणार आहे. मुरलीकांत हे भारतामधील पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते बॉक्सर होते.

'चंदू चॅम्पियन'बद्दल : 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन व्यतिरिक्त श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, राजपाल यादव, पलक लालवानी, विजय राज, भुवन अरोरा हे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'भूल भुलैया 3'मध्ये विद्या बालन आणि तृप्ती दिमरीबरोबर दिसणार आहे. सध्या कार्तिक या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याआधी या चित्रपटामधील अनेक फोटो सोशल मीडियावर कार्तिक शेअर केले होते. याशिवाय तो 'आशिकी 3' चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. भावड्या 36 वर्षातही बदलला नाही : विकी कौशलला वाढदिवसानिमित्त सनीनं दिल्या हटके शुभेच्छा! - Vicky Kaushal Birthday
  2. 'सरफरोश'ची 25 वर्षे : नवाजुद्दीन सिद्दीकीनं शेअर केला आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव - 25 years of Sarfarosh
  3. कियारा अडवाणी आणि ऐश्वर्या राय बच्चन कान फेस्टिव्हलसाठी रवाना - KIARA ADVANI AND AISHWARYA RAI

Last Updated : May 16, 2024, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.