ETV Bharat / entertainment

करीना कपूर खाननं तिच्या वाढदिवशी केली पोस्ट शेअर, सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा - Kareena Kapoor - KAREENA KAPOOR

Kareena Kapoor Khan birthday : करीना कपूर खान आज आपला 44वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी करीना कपूर खाननं तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना दाखवला आहे. Kareena Kapoor Khan shared a post on her birthday Priyanka Chopra and celebs wish Bebo

Kareena Kapoor Khan birthday
करीना कपूर खानचा वाढदिवस (Kareena Kapoor (Photo: ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2024, 1:07 PM IST

मुंबई - Kareena Kapoor Khan Birthday : बॉलिवूडची बेबो उर्फ करीना कपूर खान आज 21 सप्टेंबर रोजी 44 वर्षांची झाली आहे. करीना कपूर खान यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची मोठी बहीण करिश्मा कपूरप्रमाणेच करिनानंदेखील चित्रपटसृष्टीत भरपूर नाव कमावलं आहे. कपूर घराण्यातील फक्त करिश्मा आणि करीना यांनीच चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. आज करीना 44 वर्षांची झाली असून, ती अजूनही हिट चित्रपट देत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त करीनानं तिचे सुंदर फोटो शेअर करून स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूरनं शेअर केली पोस्ट : करीनानं चित्रपटांमध्ये आणि वास्तविक जीवनातही असं सांगितलं आहे की, ती तिची फेव्हरेट आहे. करीना कपूर खाननं 2000 मध्ये 'रिफ्युजी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात ती अभिषेक बच्चनबरोबर दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र करीनाचा पुढचा चित्रपट 'मुझे कुछ कहना है' (2001) हा हिट झाला. तिनं 2001 मध्ये पाच चित्रपट केले, ज्यापैकी 'कभी खुशी कभी गम' हा सर्वात हिट चित्रपट होता. या चित्रपटातून करीनाला चित्रपटसृष्टीत एक ओळख मिळाली. या चित्रपटामधील करिनाचा अभिनय अनेकांना आवडला. 'कभी खुशी कभी गम' चित्रपटानंतर तिनं कधीच मागं वळून पाहिलं नाही. करीनानं बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

करीनाला स्टार्सनं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : अलीकडेच करीना 'द बकिंगहॅम मर्डर्स' या चित्रपटात दिसली. या चित्रपटात ती एजंटच्या भूमिकेत होती. 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलंय. करीना कपूरनं शेअर केलेल्या फोटोंबद्दल बोलायचं झालं तर, ती यात खूपच सुंदर दिसत आहे. प्रियंका चोप्रा, रिद्धिमा कपूर साहनी, सबा पतौडी, मनीष मल्होत्रा आणि झोया अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी करीनाला तिच्या वाढदिवसाच्या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टला 4 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाइक केलं आहे. याशिवाय अनेक चाहते करीनासाठी कमेंट बॉक्समध्ये रेड हार्ट इमोजी शेअर करीत आहेत. दरम्यान करीनाच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगणबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे.

हेही वाचा :

  1. करीना कपूर खान पडली 'टॉक्सिक' चित्रपटामधून बाहेर, जाणून घ्या कारण - kareena kapoor
  2. प्रियांका चोप्रानं करीना कपूरला युनिसेफ इंडियाची नेशनल ॲम्बेसेडर बनल्यानंतर दिल्या शुभेच्छा - Priyanka Wishes Kareena
  3. करीना कपूरने टांझानियातून शेअर केले पती सैफ अली बरोबरचे रोमँटिक फोटो - Kareena with Saif Ali

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.