ETV Bharat / entertainment

Crew trailer launch : 'क्रूू'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी करीना कपूर खान झाली नाराज! - Kareena Kapoor Khan

Crew trailer launch : क्रू चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च खूप उत्साहात पार पडला. पण यावेळी करीना कपूर खान नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित असलेल्या काही चाहत्यांनी क्रृती सेनॉनला उद्देशून 'आय लव्ह यू' म्हटलं. थोड्यावेळाने एका फॅन्सने करीनालाही 'लव्ह यू' म्हटलं. मात्र तिला ते आवडलं नाही.

Kareena Kapoor Khan
'क्रूू'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी करीना कपूर खान झाली नाराज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 11:51 AM IST

मुंबई - Crew trailer launch : विमान, विमानतळ, देश विदेशात प्रवास करणारे प्रवासी यांच्याबद्दल सामान्य माणसाला नेहमीच कुतूहल असते. विमानातील क्रू नेहमी प्रवासाच्या सेवेसाठी झटत असतात. किंबहुना तसे चित्र निर्माण करण्यात आले आहे. परंतु वास्तवात विमानातील क्रू देखील माणसं असतात आणि त्यांनाही भावभावना असतात. नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवत पॅसेंजर्सची सेवा करणाऱ्या या क्रूचे खाजगी जीवन कसे असते हे आणि तीन एअर होस्टेस जेव्हा विचित्र प्रसंगात अडकल्यानंतर काय काय घडते हे मिश्कीलपणे 'क्रू' या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

Kareena Kapoor Khan
'क्रूू'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी क्रिती सेनॉन

हल्ली चित्रपटाच्या प्रोमोशन इव्हेंटच्या वेळी फॅन्सना बोलावण्याचा प्रघात सुरु झाला आहे. त्याने खूप गर्दी असल्यासारखे दिसते. यामुळे काहीवेळा होते काय की कलाकारांचे फॅन्स खूप गोंगाट करतात, 'आय/व्ही लव्ह यु' वगैरे ओरडत. यातून स्टार्स लोकांच्या इगोला खतपाणी मिळते आणि त्यांचा मूड टिकून राहतो. 'क्रू'च्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी काही फॅन्सनी 'व्ही लव्ह यु क्रिती' म्हणत आरडाओरडा केला. त्यावर करीना तिच्याकडे बघत होती आणि क्रिती म्हणाली की, 'हे काही मी ठरवून घडवून आणलेले नाहीये.' त्याचवेळी एकजण ओरडला, 'आय लव्ह यु करीना'. त्यावर करीना नाराज होत म्हणाली, 'मला आता असे काँसोलेशन प्राईझ नकोय'.

Kareena Kapoor Khan
'क्रूू'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी करीना कपूर

'क्रू'मध्ये तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सॅनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे राजेश ए कृष्णन यांनी तर निर्मिती केली आहे एकता कपूर च्या बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूरच्या अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन्स नेटवर्कने. यात दिलजीत डोसांज आणि कपिल शर्मा हे पाहुणे कलाकार म्हणून दिसतील. यात अनिल कपूर सुद्धा एखाद्या कॅमियो मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Kareena Kapoor Khan
'क्रूू'च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी करीना कपूर , तब्बू आणि क्रिती सेनॉन

अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला, 'क्रू' चित्रपट येत्या २९ मार्च ला भारत आणि जगभरात प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. Karan and Farah : फराह खाननं करण जोहरच्या आलिशान बेडरूम आणि वॉर्डरोब कलेक्शनचा व्हिडिओ केला शेअर
  2. Nick Jonas : देसी गर्लचा लूक पाहून पती निक जोनासनं केलं कौतुक
  3. फॅशन वीक 2024च्या ग्रँड फिनालेमध्ये अनन्या पांडे बनली शोस्टॉपर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.