मुंबई - Yash criticized Karan Johar : चित्रपट निर्माता करण जोहर अनेकदा त्याच्यावर टीका करणाऱ्यांची तोंड बंद करत असतो. परंतु, त्याचा मुलगा यशने जेव्हा त्याच्यावर टीका केली तेव्हा त्याच्याकडे निरुत्तर होण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. करणने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मुलाशी त्याच्या डान्ससाठी कशी हेअरस्टाईल हवी यावर बोलताना दिसतो.
करणने मुलाला विचारले, "यश, तुझ्या डान्स परफॉर्मन्ससाठी तुला तुझ्या केसांची कशी स्टाईल करायची आहे?", यावर यशने उत्तर दिले, "मला वर असेच स्पाइक केस करायचे आहेत आणि मला निळा रंगही लावायचा आहे." यावर करण म्हणाला की, " म्हणजे तुला मोहॉक स्टाईलची हेअरस्टाईल आणि निळ्या रंगाचा स्प्रे वापरायचा आहे. तुला रॉकस्टारसारखे दिसायचे आहे?" त्याच्या मुलाने उत्तर दिले, "हां"
करण जोहरने पुढे विचारले, "तुला वाटते की तू रॉक स्टार आहेस?" यावर यश उत्तर देतो, "आता नाही, पण होईन." यावर करण म्हणाला, " असे देव न करो, मला माहित नाही की हे चांगले होईल की नाही कारण तुला गाता येत नाही."
यानंतर यशने एक ब्रेकिंग न्यूज सांगितली, "ठीक आहे, माझ्याकडे एक न्यूज आहे. डॅडा, सर्वात वाईट हेअरस्टाईल करतो." यशच्या या उत्तराने करण जोहरला धक्का बसला. तो म्हणाला की, ''डॅडा, सर्वात वाईट हेअरस्टाईल करतो हीच तुझी ब्रकिंग न्यूज आहे का?'' यावर तो, 'हो' म्हणाला. अशा प्रकारे ट्रोलर्ससह सर्वांना निरुत्तर करणारा करण जोहर स्वतःच्या मुलाने केलेल्या टीकेमुळे निरुत्तर झाला.
चित्रपट निर्माता करण जोहरने अलिकडेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची भेट घेतली. करणने इंस्टाग्रामवर भूपेंद्र पटेलसोबतच्या भेटीचा एक फोटो शेअर केला. करण आणि भूपेंद्र पटेल संभाषण करत असल्याचा हा फोटो आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय, गुजरातच्या माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून संवाद साधण्याचा आनंद आणि विशेषाधिकार मिळाला. गुजरात हे विकास आणि प्रगतीचे प्रतीक आहे आणि ते आम्ही आमच्याकडे आणण्यासाठी उत्सुक आहोत."
करणची भूपेंद्र पटेलसोबतची भेट फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२४ च्या दरम्यान झाली. फिल्मफेअर अवॉर्ड्सची ६९ वी आवृत्ती गुजरातमधील गांधीनगर येथे गेल्या आठवड्यात पार पडली. करणने आयुष्मान खुरानासोबत हा सोहळा होस्ट केला होता.
करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाला फिल्मफेअर पुरकस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) आणि प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला) अशा 18 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले. आलियाला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातून करण जोहरने जवळपास सात वर्षांनी दिग्दर्शकाच्या खुर्चीवर पुनरागमन केले होते. या चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट हिट ठरला. त्याने अद्याप त्याच्या पुढील चित्रपटाच्या दिग्दर्शनाची घोषणा केलेली नाही.
हेही वाचा -