मुंबई - Karan Johar praises Chandu Champion trailer : अभिनेता कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर 18 मे रोजी प्रदर्शित झाला होता. 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर अनेकांना आवडला होता. 'चंदू चॅम्पियन'च्या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यननं शारीरिक परिवर्तन करून या भूमिकेला न्याय दिला आहे. दरम्यान निर्माता करण जोहरलाही कार्तिक आर्यन स्टारर "चंदू चॅम्पियन'च्या ट्रेलर पाहून धक्का बसला आहे. करण जोहरनं ट्रेलर शेअर करून कार्तिकचं कौतुक केले असून त्याच्यावर अभिनंदानाचा वर्षाव केला आहे. करणनं इन्स्टा स्टोरीवर कार्तिकचा ट्रेलर शेअर करत लिहिलं, "रक्त, घाम आणि अश्रू हा या महत्त्वाकांक्षी आणि हृदयद्रावक कहाणीचा सर्वात मोठा पुरावा आहे, कार्तिक आर्यन, कबीर खान आणि नाडियाडवालाचं हे एक मोठ यश आहे."
कार्तिक आर्यननं मानलं करणचं आभार : कार्तिकनं त्याच्या इन्स्टास्टोरीवर करण जोहरचं कौतुक करणारी पोस्ट शेअर करून त्याचे आभार मानले आहेत. करण जोहरबद्दल असं म्हटलं जात होतं की त्याच्यामुळे कार्तिक आर्यनला 'दोस्ताना 2' चित्रपट सोडावा लागला होता. त्यानंतर कार्तिक आर्यनच्या चाहत्यांनी करण जोहरला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं होतं. यानंतर त्याच्यावर नेपोटिज्मचा आरोप केला गेला होता. तसंच काही कार्यक्रमात करण जोहर आणि कार्तिक अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. करण जोहरची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
'चंदू चॅम्पियन' चित्रपट कधी प्रदर्शित होईल : बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक महिनाही उरलेला नाही. हा चित्रपट 14 जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन व्यतिरिक्त श्रद्धा कपूर,कतरिना कैफ आणि पलक लालवानी दिसणार आहेत. या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहत आहेत. दरम्यान कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'भूल भुलैया ३'मध्ये विद्या बालन आणि तृप्ती दिमरीबरोबर दिसणार आहे. याशिवाय तो 'आशिकी 3' मध्येही झळकणार आहे.
हेही वाचा :
- "मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हावी", परेश रावलची प्रतिक्रिया: दिग्गज सेलेब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क - LOK SABHA ELECTION 2024
- 'अभी तो वोटिंग शुरू हुई है', म्हणत अमिताभ बच्चननं मतदानासाठी केलं अनोख्या स्टाईलमध्ये आवाहन - LOK SABHA ELECTION 2024
- 'देवरा पार्ट 1' मेकर्सनं नवीन पोस्टर शेअर करून ज्युनियर एनटीआरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Jr NTR Birthday