ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या लॉन्चनंतर पहिल्यांदाच कपिल शर्मानं दिली वैष्णोदेवी मंदिराला भेट - Kapil Sharma - KAPIL SHARMA

विनोदी अभिनेता कपिल शर्मानं नुकतीच कटरा येथील वैष्णोदेवी मंदिराला भेट दिली. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या लॉन्चनंतर कपिल पहिल्यांदाच देवीच्या दर्शनासाठी आला होता.

Kapil Sharma
कपिल शर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 10:46 AM IST

कटरा (जम्मू आणि काश्मीर) - कॉमेडियन कपिल शर्मानं 'नवरात्रीच्या' काळात कटरा येथील वैष्णो देवी मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतलं. भाविकांसह त्यानं क्रीम रंगाच्या पायजमासह लाल-प्रिंट केलेला कुर्ता परिधान करून मंदिरात प्रवेश केला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असलेल्या कपिलनं माध्यमांशी संवाद करणं टाळलं आहे.

कामाच्या आघाडीवर कपिल सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या नेटफ्लिक्सवरील कॉमेडी शोमध्ये दिसत आहे. या नव्या शोमध्ये कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर, किकू शारदा आणि अर्चना पूरण सिंह देखील आहेत. खूप काळानंतर या शोमध्ये कपिल आणि सुनिल ग्रोव्हर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. हा शो भव्य असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसतंय.

द ग्रेट इंडियन कपिल शोची अधिकृत लॉगलाइन आहे की, भारतातील सर्वात प्रिय विनोदी कलाकार नेटफ्लिक्सवर एक घर शोधतात आणि त्यांच्या विलक्षण पण निष्ठावान पात्रांना घेऊन येतात. द ग्रेट इंडियन कपिल शो हा विमानतळाच्या गजबजलेल्या हद्दीत सेट केलेला अनोखा चॅट शो आहे आणि यामध्ये दर आठवड्याला प्रमुख सेलिब्रिटी पाहुणे म्हणून येत असतात. नव्यानं सुरू झालेल्या या शोच्या सुरुवातीच्या भागात रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धीमा कपूर पाहुणे म्हणून आले होते.

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'क्रू' या अलिकडे रिलीज झालेल्या चित्रपटातही कपिल शर्मा दिसला होता. 'क्रू' ही तीन एअर होस्टेस महिलांची विमानसेवा उद्योगाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली कथा आहे. गंमत म्हणून किरकोळ चोऱ्या करणाऱ्या या तिघीही नकळत एका मोठ्या जाळ्यात अडकतात.

या हिस्ट कॉमेडी चित्रपटामध्ये दिलजीत दोसांझ, सास्वता चॅटर्जी, राजेश शर्मा आणि कुलभूषण खरबंदा यांच्याही भूमिका आहेत. अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क अंतर्गत रिया कपूर आणि अनिल कपूर आणि बालाजी मोशन पिक्चर्सच्या एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी याची निर्मिती केली आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क बॅनरखाली बनलेला हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित झाला.

हेही वाचा -

'क्रू'च्या निर्मात्यांनी दिली प्रेक्षकांना बेस्ट ऑफर, आता पाहा 150 रुपयांमध्ये चित्रपट - crew zing offer

भूषण मंजुळे स्टारर 'रीलस्टार'च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू! - Bhushan Manjule

राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - rajkummar rao and janhvi kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.