ETV Bharat / entertainment

'चंदू चॅम्पियन'नं कपिल देवला केलं भावूक, म्हणाले 'चित्रपट चुकवू नका' - Kartik Aaryans Chandu Champion - KARTIK AARYANS CHANDU CHAMPION

Kapil Dev Praises Chandu Champion: कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाचं यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलं होतं.अलीकडेच, भारतीय क्रिकेटचे दिग्गज कपिल देव यांनीही या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Kapil Dev Praises Chandu Champion
कपिल देवनं चंदू चॅम्पियनचं केलं कौतुक (चंदू चॅम्पियन (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 10:15 AM IST

मुंबई - Kapil Dev and chandu champion : अभिनेता कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' 14 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हापासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असून त्यानं भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांना आणि सेलिब्रिटींना त्यांची ही भूमिका खूप पसंत पडली आहे. इतकेच नाही तर कार्तिकच्या या चित्रपटानं भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनाही खूप प्रभावित केलं आहे. 'चंदू चॅम्पियन'मधला कार्तिकचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर कपिल देव देखील त्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत.

कपिल देवनं केलं कार्तिक आर्यनचं कौतुक : कपिल देव यांनाही 'चंदू चॅम्पियन'ची कहाणी खूप आवडली आहे. त्यांनी कार्तिक आर्यनला एक उत्कृष्ट अभिनेता असल्याचं म्हटलं आहे. कार्तिक आर्यननं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता अनेकजण कार्तिकचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून कौतुक करत आहेत. दरम्यान, 'चंदू चॅम्पियन'चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताना कपिल देव यांनी लिहिलं, "चंदू चॅम्पियन! चित्रपट तुम्ही चुकवू शकत नाही. हा चित्रपट स्पोर्ट्स ड्रामाच्या पलीकडे आहे, हे पाहून मी हसलो, रडलो, अभिमान वाटला. कबीर खान यांना सलाम. तुम्ही पुन्हा चांगल काम केलं आणि आणखी एक उत्तम चित्रपट बनवला. कार्तिक आर्यननं खूप आश्चर्यकारक काम केलंय. संपूर्ण कलाकार आणि क्रूचं अभिनंदन आणि आम्हाला हा चित्रपट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सर्व चॅम्पियन आहात!' "

'चंदू चॅम्पियन'ची स्टारकास्ट : कपिल यांच्या या पोस्टवर अनेक चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट एक बायोपिक आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनशिवाय भुवन अरोरा, यशपाल शर्मा, राजपाल यादव, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि भाग्यश्री बोरसे यांच्याही भूमिका आहेत. दरम्यान कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'भूल भुलैया 3' या चित्रपटामध्ये विद्या बालनबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. 'चंदू चॅम्पियन'च्या बॉक्स ऑफिसवर यशानंतर कार्तिक आर्यननं मानलं चाहत्यांचं आभार - kartik aaryan
  2. 'मुरांबा' नंतर वरुण नार्वेकर घेऊन आलाय, 'एक दोन तीन चार'! टीझर झाला प्रदर्शित! - Marathi Film 1234
  3. 'पुष्पा 2' मुळं इतर सिनेमांचं रिलीज शेड्यूल फिसकटलं, 'पुष्पा'ची होणार 'छावा'शी टक्कर, रश्मिका मंदान्नाच्याही टेन्शनमध्ये वाढ - Pushpa 2 Vs Chhava

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.