ETV Bharat / entertainment

ऋषभ शेट्टीनं 'कांतारा चॅप्टर 1'च्या रिलीजची तारीख केली जाहीर... - RISHAB SHETTY

ऋषभ शेट्टीनं अखेरीस त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'कांतारा चॅप्टर 1'च्या रिलीजची तारीख उघड केली.

Kantara Chapter 1
ऋषभ शेट्टी (Kantara Chapter 1 Release Date Announced (Photo: Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 17, 2024, 5:34 PM IST

मुंबई - ऋषभ शेट्टी-स्टारर 2022च्या ब्लॉकबस्टर 'कांतारा'च्या प्रीक्वेल रिलीजची तारीख आता समोर आली आहे. 'कांतारा: चॅप्टर 1' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. आता 'कांतारा'चा दुसरा भाग म्हणजेच 'कांतारा: चॅप्टर 1' हा चित्रपट जगभरात 2 ऑक्टोंबर 2025 रोजी रिलीज होणार आहे. यासह एक भयंकर पोस्टर रिलीज केलं गेलं आहे. यावेळी या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे चित्रपटाच्या रिलीजची माहिती दिली आहे. 'कांतारा'चा प्रीक्वेल समृद्ध सांस्कृतिक घटक आणि खोलवर रुजलेल्या परंपरांवर आधारित असणार आहे.

'कांतारा'च्या प्रीक्वेल रिलीजची तारीख जाणून चाहते खुश : याआधी ऋषभ शेट्टीला 'कांतारा' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. संपूर्ण भारतात यशस्वी ठरलेल्या या चित्रपटानं 'सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट प्रोव्हिडिंग होलसम एंटरटेनमेंट' पुरस्कारही जिंकला आहे. आपल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या विजयाबद्दल बोलताना ऋषभ शेट्टीनं संपूर्ण टीम आणि कर्नाटकातील लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. दरम्यान राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'कांतारा'च्या विजयानंतर, ऋषभ शेट्टीला विचारण्यात आलं की, आगामी प्रीक्वलसाठी प्रशंसामुळे दबाव वाढला आहे का?. यावर त्यानं स्पष्ट उत्तर दिलं होत की, तो याकडे ओझे म्हणून पाहत नाही तर दर्जेदार चित्रपट तयार करण्याची प्रेरणा म्हणून पाहतो. आता ऋषभ शेट्टीचे चाहते चित्रपटाच्या रिलीजची डेट जाणून खूप खुश झाले आहेत. अनेकजण या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

ऋषभ शेट्टी केली 'कांतारा'च्या प्रीक्वेलसाठी मेहनत : 'कांतारा' हा चित्रपट 2022 मधील उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शनासाठी ओळखला जाणारा ऋषभ शेट्टीचा चित्रपट आहे. ऋषभ शेट्टीनं अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केली होता. यात तो कलारीपायट्टू या प्राचीन भारतीय मार्शल आर्टमध्ये प्रभुत्व मिळविण्याची तयारी करताना दिसला होता. 'कांतारा: चॅप्टर 1'च्या शूटिंगच्या पुढच्या टप्प्याची तयारी करत असताना या कलेबद्दलचे त्याचे समर्पण या व्हिडिओमध्ये दिसून आले होते. 2025 मध्ये 'कांतारा चॅप्टर 1' बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे. या चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी सध्या खूप मेहनत घेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.