ETV Bharat / entertainment

रवीना टंडन पार्किंग प्रकरणावर कंगना रणौतची प्रतिक्रिया, केली पोस्ट शेअर - Kangana Ranaut

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 11:51 AM IST

Updated : Jun 3, 2024, 2:52 PM IST

Kangana Ranaut and Raveena Tondon : रवीना टंडन पार्किंग वादात कंगना रणौतनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Kangana Ranaut and Raveena Tondon
कंगना रणौत आणि रवीना टंडन (कंगना रणौत आणि रवीना टंडन (IMAGE - IANS))

मुंबई - Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या घरी गेल्या शनिवारी किरकोळ पार्किंगच्या मुद्द्यावरून झालेल्या भांडणावर अभिनेत्रीनं कंगना रणौतनं आता प्रतिक्रिया दिली आहे. रवीना टंडनवर एक ज्येष्ठ नागरिक आणि तीन महिलांबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप केला गेला होता. पोलीस तपासात या प्रकरणात रवीना दोषी आढळली नाही. दरम्यान कंगना रणौतनंही या मुद्द्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. कंगना रणौतनं तिच्या इन्स्टास्टोरीवर या प्रकरणावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, "रवीना टंडनबरोबरजे घडले ते धक्कादायक आहे, तिला 5 ते 6 लोकांनी घेरलं होतं. आम्ही या प्रकरणाचा निषेध करतो. अशा लोकांना फटकारले पाहिजे, अशा हिंसक कृत्यांमध्ये भाग घेऊ नये आणि गैरवर्तन टाळले पाहिजे."

कंगना रणौतनं दिला रवीना टंडनला पाठिंबा : गेल्या शनिवारी कार पार्किंगवरून रवीना टंडनच्या घराबाहेर किरकोळ भांडण झालं होतं. यामध्ये काही लोकांनी रवीना टंडनला धक्काबुक्की केली आणि तिच्या ड्रायव्हरबरोबर बाचाबाचीही केली. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी तक्रार देण्यास नकार दिला असून पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात कुणालाही इजा झालेली नाही. मात्र रवीना टंडनबरोबर घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर अनेकांना रवीनाला पाठिंबा दिला होता.

लोकसभा निवडणूकीमध्ये कंगना रणौत दिसली सक्रिय : कंगना रणौत आजकाल चित्रपटांपासून दूर आहे आणि राजकारणात सक्रिय आहे. तिनं लोकसभा निवडणूक 2024 मध्ये तिच्या मूळ गावी हिमाचल प्रदेशातील मंडी या हाय-प्रोफाइल जागेवरून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आहे. संपूर्ण देश 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाची उद्या म्हणजेच 4 जूनला प्रतीक्षा करत आहे. आता अनेकजण लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी होणार अशी आशा करत आहेत. दरम्यान, कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा 'इमर्जेंसी' चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. किशोरवयीन मुलांच्या संवेदनशील कथेवरील 'अनन्या व्हॉट इफ' चित्रपट थेट यूट्यूबवर प्रदर्शित - Ananya What If
  2. रियल मैड्रिड यूईएफए चॅम्पियन्स लीग जिंकल्यानंतर कार्तिक आर्यननं आनंदानं स्टेडियममध्ये मारल्या उड्या - Kartik Aaryan
  3. पनवेल फार्महाऊसबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी सलमान खानच्या फॅनगर्लला घेतलं पोलिसांनी ताब्यात - Salman Khan fan girl

Last Updated : Jun 3, 2024, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.