मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची निर्माती कंगनानं केली आहे. आता सध्या सोशल मीडियावर कंगना एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. तिनं एक लांबलचक नोट सोशल मीडियावर शेअर केली आहे. याचा स्क्रीनशॉट साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुनं देखील शेअर केला आहे. एक्सवर नोटमध्ये कंगनानं एका यूजरला उत्तर देत लिहिलं, 'तिला सर्व प्रकारच्या समस्यांशी कसे लढायचे हे माहित आहे. 'चेटकीण अशा स्त्रिया आहेत, ज्यांच्याकडे उच्च स्वाभिमान आहे , तीक्ष्ण अंतर्ज्ञान आहे, त्यांची मुक्त आत्मा आहे, ज्यांच्याकडे अदम्य इच्छाशक्ती आणि जिद्द आहे की, त्यांना प्रत्येक प्रकारची भिंत ओलांडायची आहे. हा गुण त्यांना भयावह, पिंजऱ्यात अडकलेल्या आणि शापित लोकांना धमकावणारी बनवतो.'
कंगना राणौतची पोस्ट : याशिवाय तिनं तिच्या पोस्टमध्ये पुढं लिहिलं, 'पिंजऱ्यातील लोकांचा असा विश्वास आहे की, प्रतिभावान लोकांमध्ये काही वाईट शक्ती असते आणि त्यांनी जाळून राख व्हायला पाहिजे. दुःख अनेक रूपात असते आणि या सर्वांमध्ये मत्सर भावाना वाईट असते. तुम्ही एक स्मार्ट निवड करू शकता. ते विशेष लोक आहेत, जे अशी निवड करतात, पिंजरा तोडून मुक्त व्हा.' एक्स यूजर जॉन कॉलिन्सनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'चेटकिणींना घाबरू नका, ज्यांनी त्यांना जाळले अशा व्यक्तींना घाबरा.'
Witches are women who are connected to their higher self, their intuition, infectious free spirit, indomitable will power and uncontrollable urge to break all boundaries make them mysterious, frightening and threatening to those who are caged and cursed, caged people believe that… https://t.co/cUZRfFJyXL
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 19, 2024
सामंथा रुथ प्रभूनं दिली प्रतिक्रिया : आता कंगनाच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सामंथा रुथ प्रभूनं कंगना राणौतचे कौतुक केले आहे. तिनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर कंगनाच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला. यात तिनं कॅप्शनमध्ये 'शब्द' असं लिहिलं. याशिवाय तिनं ही पोस्ट कंगना राणौतला टॅगही केली आहे. एका शब्दात सामंथानं कंगनाचं कौतुक केलंय. आता सामंथाचे चाहते देखील या पोस्ट कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान सामंथाबद्दल बोलायचं झालं तर ती 'सिटाडेल: हनी बनी'मध्ये वरुण धनवबरोबर दिसणार आहे. तिची ही वेब सीरीज 7 नोव्हेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
हेही वाचा :
- शोभिता धुलिपालाबरोबर फोटो शेअर केल्यानंतर नागा चैतन्यनं ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी कमेंट सेक्शन केलं बंद
- सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन स्टारर 'सिटाडेल: हनी बनी'चा ट्रेलर रिलीज, पाहा ॲक्शन...
- थलपथी विजय आणि सामंथा रुथ प्रभू भारतातील सर्वात लोकप्रिय बनले स्टार, ऑर्मैक्स मीडियाची यादी जाहिर - Vijay and Samantha Ruth Prabhu