मुंबई - Amitabh Bachchan : 'कल्की 2898 एडी'मध्ये अश्वत्थामाची भूमिका साकारणाऱ्या अमितभाभ बच्चन यांचं कौतुक होत आहे. या चित्रपटानं या वीकेंडाला खूप कमाई केली आहे. यानंतर 'बिग बी'नं गेल्या रविवारी चाहत्यांची भेट घेतली होती. एवढेच नाही तर यावेळी अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना भेटवस्तूही दिल्या. रात्री उशिरा लिहिलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये, त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत.
7 जुलै रोजी 'बिग बीं'नी त्यांच्या ब्लॉगवर त्यांची अनेक फोटो पोस्ट केले. यावर त्यांनी लिहिलं की, "हा क्षण खूप भावनिक आहे. माझ्या घरी येणाऱ्या सर्व लोकांच्या उपस्थितीचे शब्दात वर्णन करता येणार नाही. तुम्हा सर्वांचे चांगले होवो 'देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, हीच माझी प्रार्थना आहे. हे प्रेम मी सदैव माझ्या मनात ठेवीन. हीच माझी ठेव आहे. मी तुम्हाला सदैव माझ्या मनात स्थान देईन."
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग : अमिताभ बच्चन यांनीही रविवारी 7 जुलै सकाळी त्यांच्या घरी मंदिरात शिवाभिषेक केला. त्यांनी ब्लॉगवर पोस्ट केली. ब्लॉगची सुरुवात ओम नमः शिवाय केली. यानंतर त्यांनी लिहिलं, "खूप शिकायचे बाकी आहे. इतर चित्रपट पाहिल्यावर आश्चर्य वाटते, अभिनय, दिग्दर्शन हे सगळंच किती सुंदर आहे. मला असे वाटते, जिथे चित्रपटाते काम होते, तेथे मला राहायला आवडेल." अमिताभ बच्चन हे 'कल्की 2898 एडी'च्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटामध्ये प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, किर्ती सुरेश, कमल हासन, डलकर सलमान आणि इतर कलाकारांनी सुंदर अभिनय केला आहे.
'कल्की 2898 एडी'ची कमाई : 'कल्की 2898 एडी' रिलीजच्या 11 दिवसात असून देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 507 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय जगभरात या चित्रपटानं 750 कोटी रुपयांची कमाई केली आहे. निर्मात्यांना आशा आहे की, हा चित्रपट 1000 कोटींहून अधिक कमाई करेल करेल. 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या 'कल्की 2898 एडी'ला पाहण्याची खूप क्रेझ आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होत आहे. अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते पुढं तामिळ चित्रपट 'वेट्टायन'मध्ये रजनीकांतबरोबर दिसणार आहे.
हेही वाचा :