ETV Bharat / entertainment

ज्यु. एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1' ओटीटीवर, नेटफ्लिक्सनं केली घोषणा - DEVRA PART 1 ON OTT

ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रवाहित होणार आहे. सुरुवातीला दाक्षिणात्य भाषामध्ये झळकणार असलेला हा चित्रपट लवकरच हिंदीतही दिसेल.

Devra Part 1 on OTT
'देवरा पार्ट 1' ओटीटीवर (Devra Part 1 poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 5, 2024, 4:07 PM IST

मुंबई - साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'देवरा पार्ट 1' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. साऊथमध्ये या चित्रपटाला तुफान यश मिळालं. भारतामध्ये या चित्रपटानं 291 कोटींची कमाई केली आहे. थिएटरमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

'देवरा पार्ट 1' नेटफ्लिक्सवर होणार प्रवाहित - ज्युनियर एनटीआरची दमदार भूमिका असलेल्या 'देवरा पार्ट 1' चित्रपटाची ओटीटीवर प्रतीक्षा करत असलेल्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 8 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट दिसणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या दाक्षिणात्य भाषामध्ये प्रवाहित होईल. त्यानंतर लवकरच हा सिनेमा हिंदीतही झळकेल असं नेटफ्लिक्सनं आपल्या सशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय.

"भिती वरचढ होण्याची, समुद्र लाल भडक होण्याची आणि पर्वतांनी वाघला सलाम ठेकण्याची वेळ जवळ आली आहे. 8 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर देवरा पहा, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये. लवकरच हिंदीत येत आहे.", असं या पोस्टमध्ये म्हटलंय.

'देवरा पार्ट 1' चित्रपटाची निर्मिती कोराटाला शिवा यांनी केली आहे. 'देवरा पार्ट 1 ' चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान खलनायकाची भूमिका साकारली आहे.

'देवरा पार्ट 1 'ची स्टारकास्ट : या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर व्यतिरिक्त प्रकाश राज, श्रीकांत, शायनी टॉम चाको, अजय आणि गेटअप श्रीनू यांच्या देखील विशेष भूमिका आहेत. 'देवरा पार्ट 1' चित्रपटात ज्युनियर एनटीआरनं वडील आणि मुलाची दुहेरी भूमिका केली आहे.

'देवरा' हा चित्रपट ज्युनियर एनटीआरसाठी खास होता. याबद्दल बोलताना तो भावूक होऊन म्हणाला होती की, ''मी तुम्हाला वचन देतो की, 'देवरा' चित्रपटाची वाट पाहणं हे सार्थक असेल. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर माझे चाहते गर्वानं आपली कॉलर उंच करतील.''

2016 च्या हिट 'जनता गॅरेज'नंतर ज्युनियर एनटीआरचा चित्रपट निर्माते कोरटला शिवाबरोबरचा हा दुसरा मोठा सहयोग चित्रपट आहे. 'देवरा' चित्रपटाचे दोन भागात प्रदर्शित होणार आहे. 'देवरा' चित्रपटाचा पहिला भाग या वर्षी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे जान्हवीनं साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. दरम्यान ज्युनियर वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'एनटीआर 31'मध्ये दिसणार आहे. याशिवाय पुढं तो 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशनबरोबर असणार आहे. हा चित्रपट त्याचा सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.