ETV Bharat / entertainment

गणेश चतुर्थीच्या दिवशी 'देवरा'च्या पोस्टरसह ट्रेलर रिलीजची तारीख झाली जाहीर - Devara Trailer - DEVARA TRAILER

Devara Trailer Release Date: साऊथ सुपरस्टारच्या मोस्ट अवेटेड 'देवरा' चित्रपटाचा ट्रेलर हा चाहत्यांना लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान, आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह ट्रेलरच्या प्रदर्शनाची डेट जाहीर केली आहे.

Devara Trailer Release Date
देवरा ट्रेलर रिलीज डेट (जूनियर एनटीआर (Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 7, 2024, 5:03 PM IST

मुंबई - Devara Trailer: साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या आगामी 'देवरा' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक झाला आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी नवीन पोस्टर जारी करून चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 10 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 'देवरा'मधून जान्हवी कपूरनं साऊथ चित्रपसृष्टीत पदार्पण केलं आहे. ती पहिल्यांदाच ज्युनियर एनटीआरबरेबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो काळ्या कपड्यामध्ये दिसत आहे. याशिवाय त्याच्या हातात एक शस्त्र आहे.

'देवरा' चित्रपटाचा ट्रेलर कधी होणार रिलीज ? : पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "आज साजरा करा, काही दिवसात विजय मिळवा, 10 सप्टेंबरपासून देवरा ट्रेलरसह भीतीचा सामना करा." पोस्ट शेअर होताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया शेअर दिल्या आहेत. एकानं यूजरनं यावर लिहिलं, "ऑल द बेस्ट, एनटीआर. " दुसऱ्या एकानं लिहिलं "मास ऑन द वे." आणखी एकानं लिहिलं, "मी हा चित्रपट पाहाण्यासाठी खूप आतुर आहे." कोरटाला शिवा दिग्दर्शित 'देवरा' चित्रपटात सैफ अली खान हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल.

'देवरा' चित्रपटाबद्दल : ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या विशेष भूमिका असलेला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ज्युनियरतच्या 'आरआरआर' (2022) या चित्रपटानंतर, तो ' देवरा पार्ट 1' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतत आहे. रिलीज होण्यापूर्वीच ' देवरा पार्ट 1'नं अमेरिकेत 15,000 पेक्षा जास्त तिकिटे विकणारा सर्वात वेगवान भारतीय चित्रपट बनण्याचा विक्रम केला आहे. युवासुधा आर्ट्स आणि एनटीआर आर्ट्स यांनी ' देवरा पार्ट 1'ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाकडून ज्युनियर एनटीआरला खूप अपेक्षा आहेत.' देवरा पार्ट 1' चित्रपटात एनटीआर हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'देवरा पार्ट 1'मध्ये जूनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत झळकणार, नवीन पोस्टर व्हायरल - jr ntr
  2. 'देवरा पार्ट 1'मधील 'धीरे धीरे' गाणं पाहिल्यानंतर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडनं दिली 'ही' प्रतिक्रिया - devara part 1
  3. 'देवरा पार्ट 1' मेकर्सनं नवीन पोस्टर शेअर करून ज्युनियर एनटीआरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Jr NTR Birthday

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.