ETV Bharat / entertainment

Oscars 2024 : सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार देताना जॉन सीना पोहोचला मंचावर, 'त्या' कृतीनं झाला एकच हास्यकल्लोळ - John Cena in Oscars goes nude

John Cena in Oscars : माजी कुस्तीपटू जॉन सीना हा ऑस्कर पुरस्कार देताना चक्क निर्वस्त्र अवस्थेत मंचावर पोहोचला. त्याला पाहून सर्वच कलाकारांना हसू आवरेनासे झाले.

Oscars 2024 : सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार देण्यासाठी जॉन सीना निर्वस्त्र अवस्थेत पोहोचला मंचावर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 7:45 AM IST

लॉस एंजेलिस John Cena in Oscars : 96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये पुरस्कार वितरण सोहळा सुरू आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजल्यापासून ऑस्कर अवॉर्ड्सचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. आतापर्यंत अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्र श्रेणीत नामांकन मिळालेल्या पुअर थिंग्ज या चित्रपटानं आतापर्यंत 3 ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत. त्याचवेळी ऑस्कर सोहळ्यादरम्यान एक मजेदार व्हिडिओही समोर आलाय.

नेमकं काय घडलं : ऑस्कर 2024 मध्ये निर्वस्त्र होऊन जॉन सीनानं सर्वांना आश्चर्यचकित केलंय. होस्ट जिमी किमेल हा 50 वर्षांपूर्वीची गोष्ट स्टेजवर बोलत होता. तेव्हा लोकप्रिय कुस्तीपटू जॉन सीना हा निर्वस्त्र अवस्थेत मंचावर पोहोचला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहते त्यावर अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझायनरचा पुरस्कार देणारा कलाकारच हा कपडे घालून आला नाही, हे दृश्य पाहून अनेकांना हसू आवरले नाही. ऑस्कर सोहळ्यात जॉन सीना प्लेट घेऊन जाताना दिसत आहे. दरम्यान, ऑस्कर होस्ट करणाऱ्या जिमी किमेलने जॉन सीनासोबत स्टेजवर धमाल मस्ती केली.

सर्वेत्कृष्ट कॉस्ट्युम डिझायनरचा पुरस्कार कोणाला : पुअर थिंग्सनं सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझायन पुरस्कार जिंकला आहे. डिझायनर हॉली वॉडिंग्टन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, कपडे बनवण्यापूर्वी तिला फक्त एवढेच सांगितले होते की, ते पूर्णपणे पीरियड ड्रामासारखे नसावेत किंवा सायन्स फिक्शन फिल्मसारखे नसावेत.

माजी कुस्तीपटूचा समावेश : याशिवाय तीन यादीत प्रसिद्ध झालेल्या ऑस्कर प्रस्तुतकर्त्यांच्या यादीत माजी कुस्तीपटू रॉकच्या नावाचाही समावेश आहे. त्याचवेळी रॉक ड्वेन जॉन्सन (रॉक) सोबत मस्ती करताना दिसत आहे. ओपेनहाइमरने ऑस्कर 2024 मध्ये आतापर्यंत 2 पुरस्कार जिंकले आहेत. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी प्रथम आणि चित्रपट एडिटिंगसाठी द्वितीय पुरस्कार मिळालाय.

हेही वाचा :

  1. Oscars 2024 Winners List : कोण ठरणार ऑस्कर पुरस्काराचे विजेते, पाहा यादी
  2. पंकज त्रिपाठी स्टारर 'मैं अटल हूं' ओटीटीवर होणार लवकरच रिलीज ; पाहा तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.