मुंबई - आलिया भट्टचा 'जिगरा' आणि राजकुमार राव स्टारर 'विकी विद्या का वो व्हिडिओ' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मात्र, आलिया अभिनीत चित्रपटापेक्षा राजकुमारचा 'विकी विद्या का वो व्हिडिओ' प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अधिक यशस्वी ठरला आहे.
एका रिपोर्टनुसार 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'नं देशांतर्गत पहिल्याच दिवशी 5.25 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाची व्याप्ती 25.40 टक्के होती. विजयादशमी शनिवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट चांगली कमाई करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' आणि 'जिगरा'चं कलेक्शन : 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हा प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी व्यतिरिक्त मल्लिका शेरावत, विजय राज, अर्चना पूरण सिंग, टिकू तलसणीये आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटामध्ये राजकुमार आणि तृप्तीची केमिस्ट्री ही जबरदस्त दाखविण्यात आली आहे. दरम्यान दुसरीकडे करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या 'जिगरा' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाहिजे तशी कामगिरी करू शकलेला नाही. आलिया भट्ट स्टारर 'जिगरा'नं देशांतर्गत 4.50 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केले आहे. आता पुढं हा चित्रपट किती कलेक्शन करेल, यावर सर्वांच्या नजरा टिकून आहेत.
बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी ? : दसऱ्याच्या सुट्टी आणि रविवारमुळे 'जिगरा' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'जिगरा' या चित्रपटामध्ये आलिया भट्ट व्यतिरिक्त वेदांग रैना, आदित्य नंदा, राहुल रवींद्रन, आकांशा रंजन आणि इतर कलाकार आहेत. हा चित्रपट 90 कोटीच्या बजेटमध्ये बनला आहे. आलिया भट्ट या चित्रपटामध्ये ॲक्शन अवतारात दिसली आहे. राजकुमारच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी आलिया भट्टच्या 'जिगरा' चित्रपटाला जोरदार टक्कर दिली. आता या दोन्ही चित्रपटामध्ये कोण बाजी बॉक्स ऑफिसवर मारणार हे, काही दिवसात समजेल.
हेही वाचा :