ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' चित्रपटात जान्हवी कपूर करणार आयटम नंबर ? - जान्हवी कपूर

Janhvi Kapoor : जान्हवी कपूर आगामी बहुप्रतीक्षित अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' मध्ये आयटम नंबर सादर करु शकते, अशी एक माहिती समोर येत आहे. सामंथा रुथ प्रभूने 'पुष्पा'मध्ये 'ऊं अतावा' हे आयटम गाणे सादर केले होते त्याला मोठी लोकप्रियता लाभली होती. 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही.

Janhvi Kapoor
अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 5:35 PM IST

मुंबई - Janhvi Kapoor : साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट ठरलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवलेल्या अल्लू अर्जुन-रश्मिका मंदान्ना स्टारर यांच्या पुष्पाच्या दुसऱ्या भागाची जोरदार चर्चा होत आहे. चाहते 'पुष्पा-2' ची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, 'पुष्पा-2' संदर्भात एक अपडेट समोर आले आहे, त्यानुसार हिंदीतील स्टार अभिनेत्री जान्हवी कपूर आगामी चित्रपट 'पुष्पा: द रुलम'ध्ये डान्स नंबर देताना दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट असल्याचे मानले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आगामी चित्रपटात एक खास डान्स नंबर देताना दिसणार आहे. अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा-2 मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. या चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि चित्रपटाने जबरदस्त कमाईही केली होती. पुष्पाच्या पहिल्या भागात सामंथा रुथ प्रभूने ऊं अंतवा या अ‍ॅटम नंबरवर दिलखेचक डान्स केला होता. आता या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये जान्हवी कपूर असाच तडखा असलेला आयटम नंबर सादर करु शकते अशी बातमी आहे. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'पुष्पा - द' या अ‍ॅक्शन-थ्रिलरच्या निर्मितीचे उर्वरित काम जोरात सुरू आहे. तथापि, जान्हवी कपूरच्या या चित्रपटाच्या सहभागाबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पुष्पा: द रुलमध्ये रश्मिका मंदान्नासोबत प्रकाश राज, फहद फासिल, जगपती बाबू, सुनील आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मैत्री मुव्ही मेकर्स निर्मित या चित्रपटाकडे देशभरातील प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत.

'पुष्पा 2' चित्रपटाचे कथानक पहिल्या भागाचा जिथे शेवट झाला होता त्यानंतर सुरू होईल. यामध्ये पुष्पाने फहद फसिलच्या पात्राचा मोठा अपमान केल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे संतापलेला हा पोलीस अधिकारी आक्रमक होऊन सूड घेईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. या चित्रपटाचा टीझर मध्यंतरी खूप चर्चेचा विषय ठरला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या लूकनेही चाहत्यांना चकित केले आहे. यावर्षी रिलीज होणारा हा चित्रपट मोठा धमाका करेल असे मानले जाते.

हेही वाचा -

  1. 'गँग्स ऑफ गाझियाबाद' वेब सीरिजमधून शत्रुघ्न सिन्हा करणार ओटीटीवर पदार्पण
  2. महिला दिनानिमित्ताने श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे स्टारर 'गुलाबी' चित्रपटाची घोषणा
  3. 'कल्की 2898 एडी' टीमने शेअर केला 'इटली डायरीज'मधील दिशा आणि प्रभासचा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.