ETV Bharat / entertainment

'अन्नातून विषबाधा' झाल्यामुळे जान्हवी कपूरवर उपचार सुरू, उद्यापर्यंत मिळू शकतो डिस्चार्ज - JANHVI KAPOOR FOOD POISONING - JANHVI KAPOOR FOOD POISONING

JANHVI KAPOOR FOOD POISONING : अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मुंबईच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिला त्रास झाला आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतं. उद्यापर्यंत तिला डिस्चार्ज मिळू शकेल असा अंदाज आहे.

Janhvi Kapoor
जान्हवी कपूर ((ANI Photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 5:42 PM IST

मुंबई - JANHVI KAPOOR FOOD POISONING : अभिनेत्री जान्हवी कपूरला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जान्हवीला 'अन्नातून विषबाधा' झाल्यामुळे त्रास होऊ लागल्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जान्हवीचे वडिल बोनी कपूर यांनी आघाडीच्या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना या बातमीला दुजोरा दिला आहे.

मुंबईतील रुग्णालयात जान्हवीवर उपचार सुरू आहेत. आता तिची प्रकृती बरी असून पुढील 1-2 दिवस तिला रुग्णालयातच राहून उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात जान्हवी कपूरनं तिच्या फॅशन स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावेळी जान्हवी तिचा प्रियकर शिखर पहारियाबरोबर लग्नसोहळ्यात हजर होती. या कार्यक्रमातील फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिचे वडील बोनी कपूर, तिचा प्रियकर शिखर पहारिया यांच्यासह अनेक कलाकारांनी तिच्या लूकचं कौतुक केलं होतं.

जान्हवी कपूर आता 'उलझ'मध्ये दिसणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केला होता. या चित्रपटात जान्हवी सुहाना भाटियाची भूमिका साकारताना दिसेल. याचं कथानक सुहानाच्या भोवती फिरतं. 'उलझ'चा ट्रेलर जंगली पिक्चर्स या प्रॉडक्शन हाऊसनं इंस्टाग्रामवर रिलीज केला होता. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं की,हे, “प्रत्येकाची एक स्टोरी असते. प्रत्येक कथेत रहस्यं असतात. प्रत्येक रहस्यला एक सापळा आहे. हा गुंता सोडवणं सोपे होणार नाही." आदिल हुसैन, राजेश तैलंग, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी हे देखील सुधांशू सारिया चित्रपटाचा भाग आहेत. उलझची निर्मिती विनीत जैन यांनी केली असून जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली अमृता पांडे सहनिर्मात्या आहेत. हा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची अजय देवगण आणि तब्बूच्या 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटाची टक्कर होणार आहे.

जान्हवी कपूर अखेरची 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये राजकुमार रावच्या बोरबर दिसली होती. हा स्पोर्ट्स ड्रामा प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडला होता. आगामी काळात जान्हवीकडे एनटीआर ज्युनियरचा 'देवरा: भाग १' आहे. या चित्रपटातून ती तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे. कोरटाला सिवा दिग्दर्शित या चित्रपटाचा सैफ अली खान देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.