मुंबई - Ambedkar vs Gandhi controversy: जान्हवी कपूर तिच्या आगामी स्पाय थ्रिलर 'उलज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 'उलज'चे दिग्दर्शक सुधांशू सारिया आहेत. या चित्रपटात जान्हवी कपूरबरोबर गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यूज, राजेश तैलंग आणि आदिल हुसैन दिसणार आहेत. जान्हवी कपूर 'उलज' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. 'उलज' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी कपूरनं तिच्या वक्तव्यावर मौन सोडलं आहे, यामध्ये अजान्हवी डॉ. भीमराव आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील वादाबद्दल बोलली होती. यानंतर काहीजणांनी तिच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. या कमेंटवर आता जान्हवी कपूर उघडपणे बोलली आहे.
जान्हवी कपूरला कशाचा राग आहे?
जेव्हा जान्हवी कपूरनं हे सांगितले तेव्हा काही लोकांनी याला पीआर अॅक्टिव्हिटी म्हटलं आहे, असं असलं तरी काही लोकांनी जान्हवीच्या या कल्पनेचं समर्थन केलं. आता Reddit वर व्हायरल होत असलेल्या एका मुलाखतीत जान्हवीनं पुन्हा याबाबत चर्चा केली आहे. या कमेंटवर अभिनेत्री जान्हवी म्हणाली, "एखाद्या तरुण अभिनेत्रीचं असं मत आहे यावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे?'', मला धक्काच बसला. जान्हवी पुढे म्हणाली, "सेलिब्रिटींच्या कपड्यांवर आणि डेटिंगवरचे प्रश्न लोकांना सहज पचतात, पण जर कोणी शिक्षणाबद्दल बोलले तर ते त्याला पीआर म्हणून हिणवतात."
जान्हवी कपूर पुढे म्हणाली, "मला आठवते की लोक म्हणाले की संपूर्ण संभाषण एक पीआर स्टंट होता, मुलाखत संपल्यानंतर मी माझ्या पीआरला विचारले की मी काही चुकीचे बोलले आहे का, तर त्यांनी सांगितलं की, असं शकतं. लोकांनी गांधी आणि आंबेडकर हा मुद्दा लावून धरला आहे. मला काळजी वाटू लागली आणि भीती वाटली की त्याचा चित्रपटावर काय परिणाम होईल, यानंतर माझ्या पीआरटीमने त्या संस्थेशी संवाद साधला आणि तो भाग कापण्यास सांगितले, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला. सत्य हे आहे की माझ्या पीआर टीमला त्या संभाषणाचा काही भाग कापायचा होता, परंतु लोकांना वाटते की ही सर्व पीआर अॅक्टिव्हिटी आहे."
जान्हवी कपूरने वाचलेली डॉ.आंबेडकरांची पुस्तकं
जान्हवी कपूर या मुलाखतीत पुढे म्हणाली, ''मी दलित समाजातील चित्रपट निर्माते नीरज घायवान यांच्यासोबत बराच वेळ घालवला आहे. त्यांनी मला भारतातील वर्ग आणि जातीबद्दल जागरुक केलं आहे''. अभिनेत्री पुढे म्हणाली, ''मी त्यांच्या कथांमधून शिकले आणि मग आंबेडकरांचे 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट' हे पुस्तक वाचायचे ठरवले. जान्हवी कपूर पुढे म्हणाली की, या पुस्तकानं माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.''
जान्हवी म्हणाली, ''हे पुस्तक वाचल्यानंतर मी स्वतःला समाजाचा एक भाग समजू लागलो, मी हिंदू आहे, पण मला याबद्दल फार कमी माहिती आहे. मी आंबेडकर गल्लीत राहते, तरीही मला त्यांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही माहित नाही याची मला लाज वाटली पाहिजे.'' जान्हवी इथेच थांबली नाही. ती म्हणाली की, '' 'डिस्ट्रक्शन ऑफ द कास्ट सिस्टीम' हे पुस्तक वाचल्यानंतर मी या विषयावरील काही व्हिडिओही पाहिले आहेत. जान्हवी कपूरनं शेवटी सांगितलं की, आजच्या पिढीनं ते वाचले पाहिजे, या देशातील तरुण असल्यानं भूतकाळ जाणून घेणं आणि समाजासाठी योग्य निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे.