ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये जान्हवी विरुद्ध वैभव, अरबाज आणि निक्की रंगणार सामना... कोण मारणार बाजी? - Bigg Boss Marathi 5

author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 12, 2024, 2:58 PM IST

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळणार आहे. आता जान्हवी किल्लेकर वैभव चव्हाण, अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीच्या विरोधात खेळणार आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'चा 5 वा सीझन सतत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या शोमध्ये टास्कदरम्यान सदस्यांची भांडणे पाहायला मिळतात. 'बिग बॉस'नं दिलेल्या टास्कमुळे यंदाचा सीझन खूप गाजत आहे. टास्क झाल्यानंतर घरातील समीकरणांमध्येही बदल होताना दिसत आहे. बुधवारी पार पडलेल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये निक्की तांबोळी , अरबाज पटेल , वैभव चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर यांच्या मैत्रीत फूट पडणार असल्याचं दिसणार आहे. आता 'बिग बॉस' निर्मात्यांनी एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अरबाज पटेल , वैभव चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर एकत्र बसलेले दिसत आहेत.

जान्हवी किल्लेकर देणार वैभव आणि अरबाजला धक्का : या प्रोमोमध्ये जान्हवी वैभव आणि अरबाजला म्हणते, "आता यापुढे मी तुमच्या विरोधात खेळणार आहे. तुम्ही मला सेकंड राऊंडमध्ये कॅप्टन्सीमधून उडवलं?" यावर वैभव म्हणतो," निक्कीनं तुला काढलं आहे." यानंतर जान्हवी पुढं विचारते, "निक्कीला माझ्या कॅप्टनसीबद्दल काय प्रॉब्लेम आहे. मी एकटी खेळत असले तरी एक कुठेतरी आपल्यात मैत्री होती ना? आता आपण एकमेकांच्या विरोधाच खेळू." यानंतर अरबाज आणि वैभव हे दोघेही गोंधळात दिसतात. कॅप्टन्सीपदाच्या टास्कमध्ये दुसऱ्या फेरीत निक्की अरबाजला आर्या आणि जान्हवी यांना नॉमिनेट करण्यास सांगते. अरबाज हा निक्कीचं ऐकून आर्या आणि जान्हवीला कॅप्टन्सीपदाच्या रेसबाहेर काढतो.

जान्हवीला वाटलं वाईट : याशिवाय 'बिग बॉस मराठी'च्या निर्मात्यांनी आणखी एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यात आजच्या एपिसोडमध्ये जान्हवी आणि आर्या गप्पा मारताना दिसत आहे. जान्हवी आर्याकडे आपलं दु:ख व्यक्त करत म्हणतेय,"कॅप्टनसीसाठी मला बाद का केलं, याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. ते दोघेही निक्कीच्या डोक्यानं चालत आहेत. टास्कदरम्यान मी गेमचा विचार करत होते, यानंतर माझं नाव जाहीर झाल्यानं मला मोठा धक्का बसला." असं जान्हवी आर्याजवळ म्हणताना दिसते. आता हा शो खूपच रंजक झाला आहे. या शोचा आता सातवा आठवडा सुरू झाला आहे. यावेळी कुठला स्पर्धक घराबाहेर होईल, यावर सर्वांचं लक्ष आहे.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावंकर यांच्यात भाजीवरुन झाली झुंज - Nikki Tamboli VS Varsha Usgaonkar
  2. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये संग्राम चौगुले विरुद्ध निक्की तांबोळीची लढत, व्हिडिओ व्हायरल - BIGG BOSS MARATHI
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री संग्राम चौगुलेनं घेतला निक्की आणि अरबाजबरोबर पंगा... - Sangram Chougule fight with nikki

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.