ETV Bharat / entertainment

उर्वशी रौतेला अभिनीत 'जेएनयू'चा ट्रेलर पाहून युजर्स भडकले - Jahangir National University

JNU trailer: उर्वशी रौतेला स्टारर आगामी 'जेएनयू' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून आता युजर्स भडकले आहेत.

JNU trailer
जेएनयू ट्रेलर (जेएनयू (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 5:35 PM IST

मुंबई - JNU Trailer release : भारतातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठामध्ये जवाहरलाल नेहरू, विद्यापीठ हे सर्वोच्च मानलं जातं. याठिकाणी विद्यार्थांच्या होणाऱ्या निवडणुकांपासून ते इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा नेहमी ऐकायला मिळत असते. याचं विद्यापीठातून अनेक नामांकित व्यक्ती घडलेले आहेत. आजही जेव्हा जेएनयूमधून बाहेर पडलेला आणि कोणत्याही संस्थेत कार्यरत असलेल्या व्यक्तीबद्दल आदर बाळगला जातो. याचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला 'जहांगीर नेशनल यूनिवर्सिटी' असं नाव देऊन एक चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज 17 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे.

ट्रेलरवर लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या : आता या चित्रपटाचं ट्रेलर सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. 'जेएनयू' (जहांगीर नेशनल यूनिवर्सिटी)च्या ट्रेलरमध्ये विद्यापीठात सुरू असलेले राजकारण दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात दोन विचारसरणीचे लोक विविध मुद्द्यांवर एकमेकांशी भिडताना दिसतील. 'जेएनयू' चित्रपटात उर्वशी रौतेला, रवी किशन, पियुष मिश्रा, रश्मी देसाई यांसारख्या कलाकार असणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन विनय वर्मा यांनी केलं आहे. दरम्यान, 'जेएनयू'च्या ट्रेलर पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत या चित्रपटाला मुर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. या पोस्टवर एका यूजरनं लिहिलं, "अजून एक मुर्खपणा चित्रपट फ्लॉप होईल, लिहून घ्या." दुसऱ्या एकानं लिहिलं, "आणखी एक पागलपणा करत आहे."

'जेएनयू' ट्रेलर : आता हा चित्रपट लोकांना आवडतो की नाही हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 'जेएनयू' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला की नाही हे काही दिवसात समजेल. हा चित्रपट 21 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. ट्रेलर रिलीज करताना निर्मात्यांनी कॅप्शन लिहिलं, "जेव्हा एंटी नेशनलिज्म शिक्षणावर वर्चस्व गाजवते. तेव्हा कॉलेज कॅम्पस रणांगण बनते. डावे विरुद्ध उजवे यांच्या संघर्षाचे साक्षीदार व्हा." या चित्रपटाची निर्मिती प्रतिमा दत्ता यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी 'जेएनयू'चा टीझर रिलीज करण्यात आला होता. हा टीझर अनेकांना आवडला नव्हता. अनेकांनी टीझर पाहून या चित्रपटाच्या निर्मात्यांना ट्रोल केलं होत.

हेही वाचा :

  1. अनिल कपूरनं ॲक्शन ड्रामा 'सुभेदार'मधील शेअर केला फोटो - ANIL KAPOOR
  2. अल्लू अर्जुननं नाकारला ॲटलीचा चित्रपट, सलमान खानची झाली एंट्री - allu arjun
  3. कन्नड फिल्म इंडस्ट्रीवरील कलंक पुसला जावा आणि रेणुकास्वामीच्या पत्नीला न्याय मिळावा, किच्चा सुदीपची मागणी - Darshan Arrest in Murder Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.