नवी दिल्ली Jacqueline Fernandez News : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर विरोधात दिल्ली पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. जॅकलिन फर्नांडिसनं चंद्रशेखरवर छळ केल्याचा आणि तुरुंगात जाण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिननं सुकेश चंद्रशेखरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
ईमेल करत केली तक्रार : मिळालेल्या माहितीनुसार, जॅकलिननं तिच्या अधिकृत ईमेल आयडीवरून पोलीस आयुक्त संजय अरोरा आणि विशेष पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) यांना ई-मेल पाठवला आहे. तसंच जॅकलिनच्या तक्रारीवरून प्राथमिक तपास सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ईमेलसोबत जॅकलिननं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या तीन बातम्याही जोडल्या आहेत. जॅकलिननं आपल्या ई-मेलमध्ये उच्च पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
काय आहे प्रकरण : अलीकडेच जॅकलिन फर्नांडिसनं सुकेश चंद्रशेखरबाबत दिल्ली न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये तिनं सुकेशशी संबंधित कोणतेही पत्र मीडियामध्ये प्रसिद्ध करणे थांबवण्याच्या सूचना देण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना सुकेशनेही न्यायालयात अर्ज दाखल केला होता की, त्याला त्याचे मित्र, कुटुंबीय, नातेवाईक आणि कायदेशीर सल्लागारांना पत्र लिहिण्याचा अधिकार आहे. तसंच कायदा आणि संविधानानुसार मी तुरुंगात असलो तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येतो, असंही सुकेशनं आपल्या अर्जात म्हटलं होतं. सुकेश चंद्र शेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर 200 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला होता. सुकेश चंद्रशेखर हा तिची प्रतिमा खराब करण्यासाठी तुरुंगातून पत्र लिहित असल्याचा आरोपदेखील जॅकलीननं केला होता.
हेही वाचा -
- Sukesh Bollywood Connection : ठग सुकेशचा आणखीही बॉलिवूड अभिनेत्रींशी होता संपर्क, ईडीला दिलेल्या निवेदनात खुलासा
- Jacqueline in Court: मनी लाँड्रिंग प्रकरण, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस कोर्टात हजर, आता 18 एप्रिलला होणार सुनावणी
- Jacqueline Fernandez : 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची कोर्टात हजेरी