ETV Bharat / entertainment

जॅकी आणि वाशू भगनानी यांनी अली अब्बास जफरविरोधात केली तक्रार दाखल, काय आहे प्रकरण घ्या जाणून ... - Ali Abbas Zafar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Ali Abbas Zafar : 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि निर्माते वाशू आणि जॅकी भगनानी सध्या चर्चेत आले आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी अली अब्बास जफरवर काही आरोप करून तक्रार दाखल केली आहे.

Ali Abbas Zafar
अली अब्बास जफर (instagram)

मुंबई - Ali Abbas Zafar : अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट थिएटरमध्ये काही विशेष कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाच्या अपयशामुळे निर्माते आणि कलाकार खूप चिंतेत होते. चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवसानंतर 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकात मतभेद झाल्याचं आता समजत आहे. यांच्यात पैशांमुळे वाद झाला आहे. हा वाद इतका वाढला, की आता दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. दिग्दर्शक अली अब्बासनं निर्मात्यांवर पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. याशिवाय निर्माते वाशू आणि जॅकी भगनानी यांनीही अली अब्बास जफरवर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ? : पूजा एंटरटेनमेंटचे मालक वाशू आणि जॅकी भगनानी यांनी अली अब्बास जफरवर 3 सप्टेंबर रोजी निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. वाशू आणि जॅकी भगनानी यांनी अली अब्बास त्यांनी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अबुधाबीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात अली अब्बास जफरबरोबर आकाश रणदिवे आणि हिमांशू मेहरा यांचीही नावे आहेत. हे प्रकरण फसवणूक, ब्लॅकमेलिंग, चोरी, खंडणी, मनी लाँड्रिंगसंबंधित असल्याचं एफआयआरच्या प्रतीमध्ये सांगण्यात आलंय. या प्रकरणात 9.50 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे.

अली अब्बास जफर यांनीही केले आरोप : या प्रकरणी अली अब्बास जफरनं निर्मात्यांवर 7.35 कोटी रुपये न दिल्याचा आरोप केला आहे. आता हे प्रकरण खूप चर्चेत आलंय. वाशू आणि जॅकी भगनानी यांनी याप्रकरणी 3 सप्टेंबर 2024 रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, हा वाद आणखीच वाढला आहे. निर्मात्याचा दावा आहे की, दिग्दर्शक अली अब्बास जफर स्वत:ला बरोबर सिद्ध करण्यासाठी अशा खोट्या अफवा पसरवत आहेत. आता वांद्रे पोलिस स्टेशन लवकरच अली अब्बास जफरला समन्स पाठवू शकतात. दरम्यान अली अब्बास जफरनं यशराज फिल्म्सनंतर एकही यशस्वी चित्रपट केला नाही. आता सध्या ते एका हिटच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा :

  1. 'बडे मियाँ छोटे मियाँ' जगभरात पाचव्या दिवशी करणार 100 कोटींचा टप्पा पार - bade miyan chote miyan
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट पुढे ढकलली ; अक्षयसह टायगरनं शेअर केला व्हिडिओ - bade miyan chote miyan release date
  3. 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या एका दिवसाच्या स्टंटचा खर्च होता 3-4 कोटी, दिग्दर्शकानं केला खुलासा - Bade Miyan Chote Miyan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.