मुंबई - Met Gala 2024 : जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस फॅशन इव्हेंट मेट गाला पुन्हा एकदा जोरात सुरू आहे. मेट गाला 2024 यावेळी निसर्गाचा संदेश देत आहे आणि म्हणूनच यंदाच्या इव्हेन्टची थीम 'द गार्डन ऑफ टाइम' आहे. येथे जवळपास सर्वच सुंदरी फुलांच्या वेशभूषेत आपले सौंदर्य दाखवत आहेत. फॅशन, चित्रपट, दूरदर्शन, संगीत, थिएटर, व्यवसाय, क्रीडा, सोशल मीडिया आणि राजकारण यासह विविध व्यावसायिक क्षेत्रांमधील व्यक्तींना या मेट गालामध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारतातून बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्ट, मोना पटेल, नताशा पूनावाला, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी देखील या जागतिक पॅशन सोहळ्यात सामील झाल्या आहेत.
ईशाने भारतीय फॅशन डिझायनर राहुल मिश्राने डिझाइन केलेला साडीचा गाऊन घातला आहे. याचे डिझाईन कार्यक्रमाच्या थीम 'द गार्डन ऑफ टाइम'वर आधारित आहे. ईशा अंबानीचा हा साडी गाऊन तयार होण्यासाठी तब्बल 10 हजार तास लागले होते. जाणून घेऊया काय आहे ईशा अंबानीच्या साडी गाऊनची खासियत.
10 हजार तासात तयार झालेला साडी गाऊन
भारतीय फॅशन डिझायनर राहुल मिश्रा आणि अनिता श्रॉफ अदजानिया यांनी मेट गाला 2024 साठी ईशा अंबानीचा पोशाख डिझाइन केला आहे. त्याचबरोबर अनिता आणि राहुलने स्वतः मेट गालाच्या रेड कार्पेटवरून ईशाचे फोटो शेअर केले आहेत आणि त्याची खासियतही सांगितली आहे. ईशा अंबानीचा हा संपूर्ण साडी गाऊन एम्ब्रॉयडरी केल्या सुंदर फुलांनी सजलेला आहे. अनिताने सांगितले की, हा गाऊन मेट गाला 2024च्या द गार्डन ऑफ टाइमच्या थीमवर आधारित आहे. राहुल मिश्राबरोबर याचं डिझान तयार करण्यात आलं आहे. ते बनवण्यासाठी आम्हाला 10 हजार तास लागले आहेत. ते भारतीय कारागिरांनी स्वतःच्या हातांनी विणले आहे, ते पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. नाजूक फुले, फुलपाखरे आणि ड्रॅगनफ्लाय्सने हा गाऊन सजवलेला आहे.
काय आहे गाऊनची खासियत
या साडी गाऊनच्या डिझाईनमध्ये फरीशा, जरदोरी, नक्षी आणि भरतकाम आहे. याबरच यामध्ये फ्रेंच नोट्स देखील आहेत. हा गाऊन पुनर्जन्माच्या आशेचा संदेश देणारा आहे. देशातील अनेक गावांतील कारागिरांनी स्वत:च्या हाताने हे विणले आहे. यामध्ये देशाच्या प्राचीन कोरीवकाम आणि लघु चित्रकला हे कला प्रकार वापरून तयार केलेला आहे. यामध्ये जयपूरचे कारागीर हरी नारायण मारोटिया यांनी बनवलेले एक छोटेसे पेंटिंग देखील आहे, ही भारतात शतकानुशतके प्रचलित एक पारंपारिक कला आहे. याबरोबरच यावर राष्ट्रीय पक्षी मोरही आहे. ज्वेलरीमध्ये कमळाचे हाताचे ब्रेसलेट, कानातले, फ्लॉवर चोकर, हे सर्व विरेन भगत यांनी डिझाइन केलेले आहे.
हेही वाचा -