ETV Bharat / entertainment

इरफान खानचा मुलगा बाबिल खाननं वडिलांच्या डेथ अ‍ॅनिवर्सरीपूर्वी शेअर केली भावनिक पोस्ट - irrfan khans son babil khan

Babil Khan: इरफान खानचा मुलगा बाबिल खान सध्या चर्चेत आला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

Babil Khan
बाबिल खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 10:14 AM IST

मुंबई- Babil Khan: बॉलिवूड अभिनेता इरफान खानची 29 एप्रिलला डेथ अ‍ॅनिवर्सरी आहे. याआधी मुलगा बाबिल खाननं वडिलांची आठवण करत एक भावनिक नोट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या नोटमध्ये त्यानं लिहिलं, "तू मला योद्धा व्हायला शिकवलं आहेस, तसेच सर्वांना प्रेम आणि दयाळूपणानं जोडायलाही शिकवले आहेस. तू मला आशा शिकवलीस आणि लोकांसाठी लढायला शिकवलेस. तुमचे चाहते, तुमचे कुटुंब आहे आणि मी तुम्हाला वचन देतो बाबा, जोपर्यंत तुम्ही मला बोलावत नाही, तोपर्यंत मी माझ्या लोकांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी लढेन. मी हार मानणार नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो."

बाबिलला दिला चाहत्यांनी दिलासा : आता बाबिलच्या पोस्टवर अनेकज कमेंट्स करून त्याला लढत राहण्याचा सल्ला देत आहेत. एका चाहत्यांनं लिहिलं, "भाऊ सर्व काही ठिक आहे ना? तुझ्यासाठी आता मला चिंता होत आहे, काही असेल तू पोस्टद्वारे सांगू शकतो." दुसऱ्या एकानं लिहिलं, "तूझे वडील हे खूप अष्टपैलू अभिनेता होते आणि त्यांना तुझ्यावर नेहमीच अभिमान होता तू हार मानू नको." आणखी एकानं लिहिलं," नेहमी खुश रहा बाबिल, तुझे वडील तुझ्याबरोबर नेहमीच राहणार." बाबिल खानला त्याच्या साध्या व्यक्तिमत्वासाठी ओळखलं जाते. तो बाकी स्टार किड्स सारखा कुठल्याही पार्टीमध्ये दिसत नाही, पण तरही तो खूप चर्चेत असतो.

इरफान खानचा मृत्यू : बाबिल खान शेवटी नेटफ्लिक्स सीरिज 'द रेल्वे मेन'मध्ये दिसला होता. या वेब सीरीजमध्ये त्यानं के के मेनन, आर माधवन आणि दिव्येंदू शर्मा यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. दरम्यान इरफान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक होता. त्यानं ऑस्कर-नामांकित हिंदी चित्रपट 'सलाम बॉम्बे'द्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. 'लाइफ इन अ...मेट्रो', 'द लंचबॉक्स' आणि 'हिंदी मीडियम' यासारख्या हिट चित्रपटांमध्ये त्यानं अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 29 एप्रिल 2020 रोजी इरफानचा मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. त्याला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

  1. 'कल्की 2898 एडी' बाबत मोठं अपडेट! प्रभास स्टारर चित्रपटाला मिळाली नवी रिलीजची तारीख - Kalki 2898 Ad Update
  2. "दरमहा 4 लाखाचा ट्रेनर परवडत नाही तर बॉलिवूड सोड" : परिणीती चोप्राला मिळाला होता सल्ला - Parineeti Chopra
  3. 'खेल खेल में'पासून ते 'वेलकम 3'पर्यत यंदा अक्षय कुमारचे रिलीज होणार सलग 5 चित्रपट - akshay kumar Movies

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.