ETV Bharat / entertainment

स्वातंत्र्यदिनी 'अलबत्या गलबत्या' रंगभूमीवर करणार विश्वविक्रम - Albattya Galbattya Theatre Play

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 6:29 PM IST

Albattya Galbattya : स्वातंत्र्यदिनी 'अलबत्या गलबत्या' नाटक रंगभूमीवर इतिहास रचणार आहे. या नाटकाचे सलग 6 प्रयोग होणार आहेत.

Albattya Galbattya
अलबत्या गलबत्या (Etv Bharat)

मुंबई - Albattya Galbattya : प्रायोगिक, व्यावसायिक नाट्यसृष्टीच्या युगात सध्याच्या घडीला लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आहेत. या नाटकांनी लहानांबरोबर मोठ्यांचीही मनं जिंकली आहेत. 'अलबत्या गलबत्या' हे नाटकही त्यापैकीच एक. रत्नाकर मतकरी लिखित हे नाटक रंगभूमीवर आणण्याचं काम निर्माते शिवधनुष्य आणि राहुल भंडारे यांनी केलं आहे. या बालनाट्यानं आता एक इतिहास रचला आहे. 'अलबत्या गलबत्या' या नाटकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. आता हे नाटक एका नव्या विश्वविक्रमासाठी सज्ज झालं आहे.

स्वातंत्र्यदिनी पाहा 'अलबत्या गलबत्या' : झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत थिएटर निर्मित 'अलबत्या गलबत्या' या नाटकाची टीम येत्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला सलग 6 प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच जागतिक विक्रम करणार आहे. सकाळी 7.00 ते रात्री 10.30 यावेळेत हे 6 विश्वविक्रमी प्रयोग दादरच्या श्री शिवाजी मंदिरमध्ये रंगणार आहेत. मराठी रंगभूमीवर 'माईलस्टोन' ठरलेल्या या नाट्यकृतीचा अशा प्रकारचा प्रयोग कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांनाच एक मोठं आव्हान असलं तरी कलावंतांना यामधून खूप काही शिकायला मिळेल, असं मत निर्माते राहुल भंडारे यांनी व्यक्त केलंय. हा भव्य नाट्यपट एकाच दिवशी, एकाच थिएटरमध्ये एकापाठोपाठ बघणं म्हणजे नाट्यरसिकांसाठी पर्वणीच आहे. या सलग नाट्यानुभवाच्या संकल्पनेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, या नाटकाची जोरदार तिकीटविक्री सुरू झाली आहे. स्वातंत्र्यदिनी, स्वातंत्र्याचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर 'अलबत्या गलबत्या' नाटकाचे होणारे हे सलग प्रयोग अजिबात चुकवू नका.

1000व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू : अनेक विक्रमांना गवसणी घालत 'अलबत्या गलबत्या' बालनाट्याची घौडदौड सुरू आहे. कोविडचा काळ सोडला तर 6 वर्षात या नाटकानं 800 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. आता 1000व्या प्रयोगाकडे या नाटकाची वाटचाल सुरू आहे. कलेप्रती असणारी बांधिलकी जपत कलाक्षेत्रासाठी वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्या कलावंतांमध्ये निर्माते राहुल भंडारे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. 'अलबत्या गलबत्या' नाटकाच्या प्रयोगाच्या तिकीटांसाठी नाट्यरसिकांनी लावलेल्या रांगा या त्याच्या अभूतपूर्व यशाची कल्पना देतात. या नाटकानं बालरंगभूमीवर अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. या सर्व नाट्यानुभवासाठी नाटकाच्या टीमनं जय्यत तयारी सुरू केली आहे.

'अलबत्या गलबत्या' स्टार कास्ट : शाळा सुटता, पुस्तक मिटता, करुया आपण गमत्या जमत्या.. अलबत्या गलबत्या..... अलबत्या गलबत्या....अलबत्या गलबत्या... अलबत्या. असं म्हणत चिंची चेटकिणीची धमाल प्रेक्षकांना हसवत हसवत थरार, उत्सुकता आणि विनोदाची तिहेरी मेजवानी देते. चेटकीण झालेले निलेश गोपनारायण यांच्याबरोबरच सनीभूषण मुणगेकर, श्रद्धा हांडे आदी दहा कलाकारांची फौज आपल्या अफलातून उत्साहानं प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन पुन्हा एकदा करणार आहे. या नाटकाचं दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केलय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.