ETV Bharat / entertainment

बॉलिवूडसह साऊथ सेलिब्रिटींनी साजरा केला स्वातंत्र्य दिन, चाहत्यांना सोशल मीडियातून दिल्या शुभेच्छा - Independence Day celebrity wishes - INDEPENDENCE DAY CELEBRITY WISHES

78th Independence Day: संपूर्ण देश आज 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटींसह साऊथच्या सेलिब्रिटींनीही स्वातंत्र्य दिन साजरा करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

78th Independence Day
78 वा स्वातंत्र्यदिन ((ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 3:42 PM IST

मुंबई - INDEPENDENCE DAY 2024 : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, कंगना राणौत अशा विविध सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं सोशल मीडियावर तिरंगा पोस्ट केला. त्यावर कॅप्शन लिहिलं, "आमचा तिरंगा उंच राहू दे. स्वातंत्र्याला सलाम! तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!"

78th Independence Day
78 वा स्वातंत्र्यदिन (instagram)
78th Independence Day
78 वा स्वातंत्र्यदिन (instagram)

बॉलिवूड स्टारनं दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा : अभिनेता सनी देओलनं स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियात म्हटलं, "आपल्या भारत मातेवर प्रेम करा. ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यांना लक्षात ठेवा. एक चांगले व्यक्ती आणि एक चांगले देशभक्त व्हा." तर बॉलिवूड क्वीन कंगना राणौतनं हातात तिरंगा ध्वज इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आयुषमान खुरानानं स्वतःचा एक फोटो शेअर करताना लिहिलं, "अजून खूप काम बाकी आहे. आपण खूप लांबवर आलो आहोत. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे." दरम्यान नुसरत भरुचा, दिशा पटानी, अनिल कपूर आणि संजय दत्त यांनीही सोशल मीडियावरून चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

78th Independence Day
78 वा स्वातंत्र्यदिन (instagram)
78th Independence Day
78 वा स्वातंत्र्यदिन (instagram)
78th Independence Day
78 वा स्वातंत्र्यदिन (instagram)
78th Independence Day
78 वा स्वातंत्र्यदिन (instagram)

'या' साऊथ सेलिब्रिटींनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा : साऊथ सेलिब्रिटींनीही स्वातंत्र्य दिन साजरा करत सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मेगास्टार चिरंजीवी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत लिहिलं, "स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांनी केलेला संघर्ष आणि बलिदान लक्षात ठेवूया. त्यांचे आदर्श आपल्याला नेहमी नीतिमत्ता, करुणा आणि चांगल्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात! जय हिंद." पुष्पा स्टार अल्लू अर्जुननंही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान दुल्कर सलमान, समांथा रुथ प्रभू, केजीएफ स्टार यश यांनीदेखील पोस्ट शेअर करून चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

78th Independence Day
78 वा स्वातंत्र्यदिन (instagram)
78th Independence Day
78 वा स्वातंत्र्यदिन (instagram)

हेही वाचा-

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण; तब्बल 98 मिनिटं केलं संबोधन, 'वन नेशन, वन इलेक्शन'बाबत केलं भाष्य - Independence Day 2024
  2. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यास सक्षम; लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एल्गार - Independence Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.