ETV Bharat / entertainment

इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांच्या नात्याबद्दल झाला खुलासा, वाचा सविस्तर - Palak and Ibrahim Dating - PALAK AND IBRAHIM DATING

Palak Tiwari-Ibrahim Ali Khan Dating: इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी हे कथित जोडपे तीन वर्षांपासून डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. या जोडप्यानं आपल्या नात्याविषयी कुठलाही खुलासा केलेला नाही.

Palak Tiwari-Ibrahim Ali Khan Dating
इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी डेटिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 5:40 PM IST

मुंबई - Palak Tiwari-Ibrahim Ali Khan Dating: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हे लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. पलक आणि इब्राहिमच्या डेटिंगच्या अफवा खूप दिवसांपासून पसरल्या आहेत. या कथित जोडप्यानं डेट करत असल्याच्या बातम्या अनेकदा फेटाळून लावल्या होत्या. दरम्यान त्याच्या नाताबद्दलची एक बातमी समोर आली आहे. पलक आणि इब्राहिमच्या जवळच्या एक सुत्रानं त्याच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. हे कथित जोडपे गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान करत आहे डेट ? : पलकचं नात इब्राहिमच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. मात्र या कथित जोडप्याला त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत यायचे नाही. सध्या दोघांनाही आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. पलक आणि इब्राहिम एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहेत. याशिवाय दोघेही एकमेकांना अधिक जाणून घेत आहेत. पलक आणि इब्राहिमची भेट साडेतीन वर्षापूर्वी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांना भेटू लागले आणि डेटवर जाऊ लागले. आता त्याच्यातील नात खूप घट्ट झालं आहे. इब्राहिम हा अनेकदा पलकची काळजी घेताना दिसतो. या कथित जोडप्याला अनेकदा पापाराझीनं एकत्र पकडलं आहे.

पलक आणि इब्राहिमचं वर्कफ्रंट : कथित जोडप्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पलक तिवारीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ती सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात पलकचा अभिनय अनेकांना आवडला होता. याशिवाय तिनं हार्डी संधूबरोबर एक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. तिचा हा म्युझिक व्हिडिओ खूप हिट झाला होता. दुसरीकडे इब्राहिमबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. इब्राहिम हा 'दिलर' या चित्रपटाचं शूटिंग सध्या करत आहे. याशिवाय पुढं तो 'सरजमीन' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? पाचवेळा मिळालीय जीवे मारण्याची धमकी - salman khan
  2. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan
  3. 'बेबी जॉन' ऐवजी, 'कल्कि 2898 एडी' होऊ शकतो रिलीज, जाणून घ्या कारण... - Baby John Postponed

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.