ETV Bharat / entertainment

"फुकट सल्ला देणे बंद" म्हणत, अनुराग कश्यपने केला दृढ संकल्प - ANURAG KASHYAP ON NEWCOMERS - ANURAG KASHYAP ON NEWCOMERS

ANURAG KASHYAP ON NEWCOMERS : अनुराग कश्यपने यापुढे स्वतःला हुशार आणि सर्जनशील समजणाऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवण्याचं ठरवलं आहे. अशा लोकांसाठी खूप वेळ वाया गेल्याचं त्यानं म्हटलंय. यापुढे कोणाला सल्ला द्यायचा असेल तर त्याच्या वेळेची किंमत त्यांना भरावी लागेल, असा खणखणीत इशाराच अशा फुकट चलाखांना त्यानं दिलाय.

ANURAG KASHYAP ON NEWCOMERS
अनुराग कश्यपने केला दृढ संकल्प
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 5:27 PM IST

मुंबई - ANURAG KASHYAP ON NEWCOMERS : अनुराग कश्यप हा फिल्म इंडस्ट्रीत येऊ पाहणाऱ्या प्रतिभावान कालाकारांचे कलागुण ओळखण्यासाठी जाणला जातो. आतापर्यंत त्यानं अनेक निर्मात्यांना चँपियन बनण्यासाठी मदत केलीय. क्रिएटिव्हिटी आणि बुद्धीमत्ता असलेल्या व्यक्तींचा तो एखादा रत्नपारखी होऊन शोध घेतो. अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते त्याचा सल्ला अनमोल मानतात. मात्र यापुढे अनुराग कश्यपने आपला वेळ आणि सल्ला विनामूल्य देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्याऐवजी सल्लामसलत करण्यासाठी 5 लाखांपर्यंत शुल्क आकारणार असल्याचं जाहीर केलंय.

ANURAG KASHYAP ON NEWCOMERS
अनुराग कश्यपने केला दृढ संकल्प

त्यानं आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर 1.1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स झाल्यानंतर त्यांच्याबद्दलचा अभिमान बाळगत त्यानं काही मतलबी लोकांबद्दलची नाराजी बोलून दाखवली आहे. कदाचित त्याचा हा निर्णय "शॉर्टकट शोधणाऱ्यांच्या" नाराजीतून आला असावा.

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अनुराग म्हणाला: "नवीन लोकांना मदत करण्याच्या प्रयत्नात मी बराच वेळ वाया घालवला आणि हाती काहीच लागले नाही. त्यामुळे आता यापुढे मी माझा वेळ अशा स्वतःला हुशार आणि सृर्जनशील समजणाऱ्या लोकांना भेटण्यात वाया घालवू इच्छित नाही. त्यामुळे माझा एक दर असेल. जर कोणाला मला 10-15 मिनिटांसाठी भेटायचे असेल तर मी 1 लाख, अर्धा तासासाठी 2 लाख आणि 1 तासासाठी 5 लाख घेईन. हाच माझा दर आहे. मला लोकांना भेटण्यात वेळ वाया घालवायचा कंटाळा आला आहे. जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की तुम्हाला हे दर परवडतील, तर मला कॉल करा किंवा दूर राहा." अ‍ॅडव्हान्स बुकिंग करा असंही म्हणायला अनुराग विसरलेला नाही.

"आपल्या विधानासह त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, मी म्हटल्या प्रमाणे, मला कोणीही टेक्स्ट मजकूर डीएम किंवा कॉल करू नका. पैसे भरा आणि तुम्हाला वेळ मिळेल. मी धर्मादाय संस्था नाही आणि शॉर्टकट शोधत असलेल्या लोकांमुळे मी कंटाळलो आहे."

तीन दशकांहून अधिक काळ यशस्वी कारकिर्द अनुराग कश्यपने नीरज घायवान सारख्या चित्रपट निर्मात्यांना चॅम्पियन केले आहे. त्याच्या पहिल्याच 'मसान' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'गँग्स ऑफ वासेपूर'च्या सेटवर अनुराग कश्यपला सहाय्यक म्हणून काम केलेल्या विकी कौशलला त्याने हिंदीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक बनवले आहे.

दरम्यान निर्माता म्हणून अनुराग कश्यपच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दोन मालिका, 'विश्वपुरी' आणि 'स्टारडस्ट', दोन शॉर्ट्स, 'बॉडी ऑफ फायर' (बिदाई) आणि 'बॉबी ब्युटी पार्लर' यांचा समावेश आहे. याशिवाय अनुराग कश्यप आशिक अबूच्या 'रायफल क्लब'मध्ये काम करण्यासाठी सज्ज आहे. हा त्याचा मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत एक अभिनेता म्हणून त्याचा प्रवेश आहे.

हेही वाचा -

'भूल भुलैया 3'मधील कार्तिक आर्यनच्या एंट्री गाण्यात थिकरणार 1000 डान्सर्स - Bhool Bhulaiyaa 3 Song

करीना कपूरने शेअर केली आफ्रिकन सुट्टीतील 'सेरेंगेती सन'ची झलक - Kareena Kapoor in Serengeti Park

अंकिता लोखंडेच्या सासूचा दृष्टिकोन बदलला, चित्रपट प्रदर्शित होताच म्हणाली- 'माझी सून' - Ankita lokhande

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.