ETV Bharat / entertainment

'करण अर्जुन' पुन्हा रिलीज होण्यापूर्वी हृतिक रोशननं सांगितली यातील आयकॉनिक डायलॉगची आठवण - HRITHIK ROSHAN RECALLS KARAN ARJUN

'करण अर्जुन' चित्रपटाचा सहदिग्दर्शक म्हणून हृतिक रोशननं काम केलं होतं. या चित्रपटाच्या पटकथेवेळी यातील आयकॉनिक डायलॉग कसा तयार झाला याचा किस्सा सांगितला आहे.

HRITHIK ROSHAN RECALLS KARAN ARJUN
'करण अर्जुन' 30 वर्षे (Karan Arjun poster / ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 13, 2024, 7:42 PM IST

मुंबई - आजपासून तीन दशकापूर्वी 1995 मध्ये 'करण अर्जुन' या चित्रपटानं त्यावेळच्या प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. सलमान आणि शाहरुख खान लोकप्रियतेच्या कळसावर असताना बनलेला हा स्टार स्टडेड चित्रपट अनेक अर्थानं यशस्वी ठरला होता. याचं कथानक, यातील संवाद, कलाकारांचा अभिनय, यातील हटके आणि मिश्कील पात्रं यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहात होते. आज 30 वर्षानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट परत एकदा री-रिलीज करण्याचं ठरवलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की, त्यावेळी हृतिक रोशननं या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. आता हा चित्रपट परत रिलीज होत असल्यामुळे हृतिकनं या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'करण अर्जुन' पुन्हा रिलीज होणे हा चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे आणि त्याच्या निर्मितीदरम्यान सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारणाऱ्या हृतिकनं चित्रपटाचा वारसा आणि त्याच्या स्वत:च्या कारकिर्दीवर या चित्रपटाचा झालेला परिणाम यावर सोशल मीडियातून बाष्य केला आहे.

हृतिक रोशनच्या व्हॉईस-ओव्हरमधील इंस्टाग्राम पोस्टने चित्रपटाविषयीच्या चर्चा सत्रातील पडद्यामागील गोष्ट शेअर केली आहे. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळं या चित्रपटाच्या निर्मितीच्या अनेक गोष्टी हृतिकच्या समोरच घडल्या आहेत. त्याच्या घरीच या चित्रपटाच्या लेखकाबरोबर राकेश रोशन यांनी पटकथेवर काम केलं होतं.

हृतिकनं 1992 मधील एक क्षण यानिमित्तानं शेअर केला आहे. त्यावेळी त्याचे वडील, दिग्दर्शक राकेश रोशन आणि चित्रपटाच्या लेखकांसोबत त्याच्या वडिलांच्या घरी पटकथेवर काम करत होते. याबद्दल सांगताना हृतिकनं लिहिलंय, "1992 मध्ये त्या दुपारी जेव्हा आम्ही लेखकासह सर्वजण वडिलांच्या लिव्हिंग रूममध्ये बसून करण अर्जुनच्या पटकथेवर विचारमंथन करत होतो, तेव्हा खोलीत आणखी एक दीर्घ शांतता पसरली (कधीकधी ही शांतता 10-15 मिनिटांपेक्षा जास्त चालली) आणि अचानक बाबांनी आम्हाला इंटरव्हल फाईट सीक्वेन्सचे बीट्स कसे असतील हे सांगायला सुरुवात केली. त्यांच्या भावना उचंबळून आल्या आणि ते करणच्या तोंडी असलेला संवाद जोरात ओरडले, "भाग अर्जुन !!!! bhaaaaaag अर्जुन !!!!" त्यावेळी 17 वर्ष वय असलेला मी प्रेक्षकांच्या उत्साहाचा पहिला धक्का अनुभवला !!! माझ्या अंगावर शाहरे आले होते, खोलीतले सर्वजण थिएटरप्रमाणे टाळ्या वाजवत होते. त्या दिवसापासून या कथानकात पुरता गुरफटून गेलो. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार आहे हे मला अगदी तेव्हाच कळलं होतं!!"

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'करण अर्जुन' हा एक अ‍ॅक्शन-पॅक ड्रामा चित्रपट आहे. पुनर्जन्माचा विषय अतिशय वेगळ्या पद्धतीनं यामध्ये मांडण्यात आला होता. दोन भावांनी त्यांच्यावर आणि आईवर झालेल्या अन्यायाचा बदला पुनर्जन्म घेऊन कसा पूर्ण केला याची ही रंजक गोष्ट आहे.

'करण अर्जुन' चित्रपटात हृतिक रोशनचा सहभाग कॅमेऱ्यासमोर नसला तरी त्याने वडिलांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मदत केल्यामुळे महत्त्वाची भूमिका बजावली होती. रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि हृतिकचंही आयुष्य पुढं जाऊन बदललं. हृतिकने नंतर 2000 मध्ये त्याच्या वडिलांच्या दिग्दर्शनातील 'कहो ना... प्यार है' मध्ये अभिनय पदार्पण केलं आणि आजपर्यंत तो लोकप्रिय अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये स्थिर होऊन काम करत आहे. दरम्यान, वर्क फ्रंटवर हृतिक रोशन सध्या 2019 च्या हिट 'वॉर' चित्रपटाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल 'वॉर 2' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.