ETV Bharat / entertainment

कंगना रनौतच्या झापडच्या घटनेवर हृतिक रोशनचं काय आहे मत? - hrithik roshan - HRITHIK ROSHAN

Hrithik Roshan and Kangana Ranaut : हृतिक रोशननं कंगना रणौतच्या झापड मारल्याच्या वादावर अप्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं एका पोस्टला लाईक करत कंगनाला पाठिंबा दिला आहे.

Hrithik Roshan and Kangana Ranaut
हृतिक रोशन आणि कंगना रणौत (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 12:56 PM IST

मुंबई - Hrithik Roshan and Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर एका महिला सीआयएसएफ (CISF) जवानानं कानशीलात मारली होती. यामुळे ती आता सतत चर्चेत आहे. चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ महिला जवानानं कंगनाला झापड मारल्याच्या वादावर हृतिक रोशननंही अप्रत्यक्षपणे कंगनाला समर्थन दिलं. अलीकडेच एका पत्रकारानं कंगनासह घडलेल्या या घटनेचा निषेध करत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं लिहिलं, "कोणाच्या मतावर सहमत नसल्यास हिंसेचा मार्ग निवडणे योग्य नाही." कंगनाशी संबंधित ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक सेलिब्रिटीही प्रतिक्रिया देत आहेत.

हृतिक रोशननं दिली प्रतिक्रिया : हृतिक रोशननेही पत्रकाराच्या पोस्टवर आपली सहमती दर्शवत या पोस्टला लाईक केलं आहे. याव्यतिरिक्त आलिया भट्ट, अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांनीही या पोस्टला लाईक करून कंगनाला पाठिंबा दर्शवला आहे. आधी कंगना रणौतचा एक्स बॉयफ्रेंड अध्यायन सुमननंदेखील कंगनाला पाठिंबा दिला होता. 6 जून रोजी कंगना रणौत हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरच्या मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. यानंतर तिला अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. कंगनानं निवडून आल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचं तिनं एका संवादादरम्यान सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण : दरम्यान नुकतीच गुरुवारी कंगना रणौत चंदीगडहून दिल्लीला जात होती. यावेळी एका महिला सीआयएसएफ जवानानं तिला विमानतळावर झापड मारली. याचा एक व्हिडिओही समोर आला. या अपघातानंतर लगेचच कंगनानं तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिची प्रतिक्रियादेखील शेअर केली होती. तिनं सांगितलं होतं की, "हा एक भयंकर हल्ला होता. एका महिलेनं शेतकरी आंदोलनावर कमेंट केल्यामुळे माझ्यावर हल्ला केला." कंगनानं हे संपूर्ण प्रकरण खलिस्तानी दहशतवाद्यांशी जोडलं. या प्रकरणापासून ती सतत चर्चेत असून तिला चाहते पाठिंबा देत आहे. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण कंगनाच्या बाजून बोलताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. फिल्मी दुनियेत रामोजी रावांचाच दबदबा; 'ईटीव्ही मराठी'च्या माध्यमातून दिल्या सुपरहिट मालिका - Ramoji Rao passed away
  2. न्यूयॉर्कमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा मुलगी वामिकाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल - Anushka Sharma and Virat Kohli
  3. कंगना राणौतच्या झापड मारण्याच्या घटनेवर एक्स बॉयफ्रेंड अध्यायन आणि शेखर सुमननं दिली प्रतिक्रिया - KANGANA RANAUT SLAP ROW

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.