ETV Bharat / entertainment

शाहरुख सलमान स्टारर 'करण अर्जुन'च्या ट्रेलरसाठी हृतिक रोशननं दिला आवाज, व्हिडिओ झाला व्हायरल

शाहरुख खान आणि सलमान खान यांचा 'करण अर्जुन' हा चित्रपट रि-रिलीज होत आहे. आता चित्रपटाचा ट्रेलर हृतिक रोशननं शेअर केला आहे.

karan arjun trailer
करण अर्जुन ट्रेलर (हृतिक रोशननं करण अर्जुनच्या ट्रेलरला दिला व्हॉईस ओव्हर (Movie Poster/ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 13, 2024, 3:31 PM IST

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज कलाकार शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर 'करण अर्जुन' हा चित्रपट रि- रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला, यामध्ये हृतिक रोशननं आपला आवाज दिला आहे. हा ट्रेलर शेअर करताना हृतिकनं या चित्रपटाशी संबंधित 30 वर्षे जुनी कहाणी देखील सांगितली आहे. 'करण अर्जुन' चित्रपट 1995मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी केलं होतं. आता हा चित्रपट 2024 मध्ये पुन्हा रिलीज होत आहे. करण अर्जुनच्या रि-रिलीज ट्रेलरमध्ये हृतिक रोशननं केलेला व्हॉईस ओव्हर खूप खास आहे.

'करण अर्जुन' चित्रपटचा रि- रिलीज : ट्रेलरच्या सुरुवातीला हृतिक म्हणतो "काही बंध असे असतात ज्यासाठी एक जन्म पूर्ण होत नाही, काही सूड असे असतात ज्यासाठी एकही जन्म पूर्ण होत नाही. काही कथा अशा असतात ज्यांच्यासाठी एक जन्म अपुरे पडते, काही लोक असे असतात ज्यांच्यासाठी एक जन्म पूर्ण होत नाही." 'करण अर्जुन' ही पुनर्जन्माची कथा आहे, ज्यात करण आणि अर्जुन दुसऱ्या जन्मात येऊन त्यांच्या आईच्या अपमानाचा बदला घेतात.

हृतिक रोशननं 30 वर्षे जुनी गोष्ट केली शेअर : ट्रेलर शेअर करताना हृतिकने कॅप्शनमध्ये चित्रपटाशी संबंधित एक जुना किस्सा सांगत लिहिलं, '1992च्या एका दुपारी जेव्हा आम्ही सर्वजण वडिलांच्या लिव्हिंग रूममध्ये बसलो होतो, तेव्हा लेखकाबरोबर 'करण अर्जुन'च्या कथेवर विचारमंथन सुरू होते. खोलीत खूप शांतता (कधीकधी ही शांतता 10-15 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली) आणि अचानक बाबांना कल्पना येते की करण जोरात ओरडतो, पळ अर्जुन !!!! पळ अर्जुन !!!!" पुढं हृतिकनं लिहिलं आहे."पुढं वयाच्या 17व्या वर्षी मला प्रेक्षकांच्या उत्साहाचा पहिला धक्का जाणवला!!! मला गूजबंप आले, खोलीत चित्रपटगृहासारखी टाळ्यांचा कडकडाटात गुंजत होता! मग मला कळलं की हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार आहे!! 30 वर्षांनंतर, 22 नोव्हेंबर 2024 पासून जगभरातील थिएटरमध्ये 'करण अर्जुन'चा पुनर्जन्म पाहण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही.'

'करण-अर्जुन' चित्रपटाची स्टार कास्ट : 'करण-अर्जुन'मध्ये, अभिनेत्री राखीनं पीडित आईची भूमिका साकारली आहे तर शाहरुख आणि सलमान तिची दोन मुले आहेत. ज्यांची नावे करण आणि अर्जुन आहेत. याशिवाय काजोल, ममता कुलकर्णी आणि अमरीश पुरी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 1995 मध्ये रिलीज झाला होता.

हेही वाचा :

  1. शाहरुख खान आणि सलमान खान स्टारर 'करण अर्जुन' होणार जगभरात रि- रिलीज, जाणून घ्या तारीख
  2. Salman-Shahrukh Team Up: 'करण-अर्जुन' पुन्हा येणार एकत्र, आदित्य चोपडाच्या मेगा अ‍ॅक्शन चित्रपटात दिसणार सलमान-शाहरुख
  3. सलमान खानपाठोपाठ सुपरस्टार शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी, फोन नेमका आला कुठून?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.