ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये कपिल शर्मानं आमिर खानला केला तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न - The Great Indian Kapil Show - THE GREAT INDIAN KAPIL SHOW

The Great Indian Kapil Show : कपिल शर्मानं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये आमिर खानला तिसऱ्या लग्नाबद्दल विचारल. यानंतर आमिरनं दिली खूप सुंदर प्रतिक्रिया दिली.

The Great Indian Kapil Show
द ग्रेट इंडियन कपिल शो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 1:34 PM IST

मुंबई - The Great Indian Kapil Show : कॉमेडी जगताचा बादशाह कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'द्वारे धमाका करत आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 31 मार्चपासून प्रसारित झाला. कपिल 10 वर्षांहून अधिक काळापासून त्याच्या कॉमेडीनं लोकांना हसवलं आहे. दरम्यान कपिलच्या शोमध्ये बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्व स्टार्सनी हजेरी लावली आहे, मात्र त्याच्या शोमध्ये आमिर खान कधीच आला नाही. आता कपिल शर्माच्या शोमध्ये अभिनेता आमिर खाननं एंट्री घेतली आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये आमिर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये पाहुणा म्हणून आला आहे.

कपिल शर्मानं केले आमिर खानला भन्नाट प्रश्न : नेटफ्लिक्सनं शेअर केलेल्या प्रोमोमध्ये कपिल त्याच्या जुन्या कॉमिक स्टाईलमध्ये आमिर खानला अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. सर्वप्रथम कपिलनं त्याचं शोमध्ये स्वागत केलं आणि म्हटलं, "तू आमच्या शोमध्ये आलास यावर विश्वास बसत नाही." यानंतर पीकेच्या भूमिकेत दिसणारा सुनील ग्रोवर म्हणतो, "आम्हाला 1500 रुपये द्या, आम्ही येऊ." याशिवाय आमिर देखील आम्ही येऊ म्हणतो. पुढच्या क्लिपमध्ये आमिर म्हणतो की, "मी एक गोष्ट सांगतो माझी मुले माझं अजिबात ऐकत नाहीत." पुढं आमिर म्हणतो की, "आज मी हे परिधान करून आलो आहे, यावर घरी लांबलचक चर्चा झाली होती, मी शॉर्ट्स घालून येणार होतो."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'पीके' चित्रपटावर उडवली खिल्ली : यानंतर कपिल विचारतो की, "तुम्ही असा कोणताही चित्रपट केला आहे का, जो चांगली कामगिरी करू शकला नाही?" तर यावर आमिर म्हणतो, "अलीकडे माझे दोन चित्रपट चालले नाहीत." तेव्हा कपिल म्हणतो, "तुझा चित्रपट जरी चांगला चालला नसला तरी तो व्यवसाय करतो." याशिवाय त्याला अर्चना अर्चना पूरन सिंग विचारते की, "तुम्ही अवार्ड शोमध्ये का जात नाही?" यावर आमिर म्हणतो, "वेळ खूप मौल्यवान आहे, त्याचा योग्य वापर केला पाहिजे." यानंतर कपिल आमिरच्या 'पीके' चित्रपटाच्या रेडिओ सीनबद्दल बोलतो आणि म्हणतो, "पीकेमध्ये तुम्ही जो रेडिओ धरला होता तो जरा हलला असता, तर संपूर्ण ब्रॉडकास्ट झालं असतं, याबद्दल तुला भीती वाटली नाही?" यावर आमिर म्हणतो, "मी चालत होतो तोपर्यंत ठीक होतं. मला या सीनमध्ये पळावे लागलं होत." यानंतर या गोष्टीवर अनेकजण हसतात. प्रोमोमध्ये कपिल शेवटी आमिरला सेटल होण्याबद्दल बोलतो. यावर आमिर हसतो. हा भाग शनिवारी रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंह डिप फेक व्हिडिओ प्रकरण : व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी पाठवली नोटीस - Ranveer Singh Deep fake Video
  2. 'कुली'साठी रजनीकांतनं घेतलं 300 कोटींचं मानधन, ठरला आशियातील सर्वात महागडा स्टार? - Rajinikanth
  3. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील 'छावा' चित्रपटातील विकी कौशलचा फर्स्ट लूक लीक - Vicky Kaushal

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.