ETV Bharat / entertainment

विन डिझेलनं दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक डीजे कारुसोबरोबरचा थ्रोबॅक फोटो केला शेअर - Vin Diesel - VIN DIESEL

Vin diesel and Deepika padukone : विन डिझेलनं दीपिका पदुकोण आणि डीजे कारुसोबरोबरचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विन दीपिकाला ब्लेझर घालताना दिसत आहे.

Vin diesel and Deepika padukone
विन डिझेल आणि दीपिका पदुकोण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 1:50 PM IST

मुंबई - Vin diesel and deepika padukone : विन डिझेलनं मंगळवारी संध्याकाळी त्याच्या चाहत्यांना चकित केलं. त्यानं सोशल मीडियावर दीपिका पदुकोण आणि चित्रपट निर्माता डीजे कारुसो यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2017मधील आहे, जेव्हा तो 'एक्सएक्सएक्स रिटर्न ऑफ जेंडर केज' या चित्रपटाचं प्रमोशन करत होता. या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होती. 'एक्सएक्सएक्स रिटर्न ऑफ जेंडर केज' चित्रपटाचं दीपिका आणि विननं भारतात जोरदार प्रमोशन केलं होतं. यादरम्यान दोघांची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. व्हायरल होत असलेल्या फोटोच्या पोस्टमध्ये विन डिझेलनं एका भावा-बहिणीच्या कहाणीबद्दलचा उल्लेख केला आहे.

विन डिझेलनं दीपिका पदुकोणबरोबरचा केला फोटो शेअर : व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विन डिझेल एका ऑटोच्या शेजारी उभा आहे आणि दीपिकाला ब्लेझर घालून देताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिले की, ''जेव्हा माझ्याबरोबर एकापेक्षा जास्त वेळा काम करू इच्छिणाऱ्या दिग्दर्शकांचा विचार करतो तेव्हा मला नेहमीच चांगलं वाटते. मी भारतात गेलो तेव्हाचा हा फोटो आहे. मी दीपिकाला वचन दिले होते की मी दिग्दर्शक, डीजे कारुसो यांच्याबरोबर भारतात येईन... सध्या आम्ही प्रॉडक्शन बरोबर भांडत आहोत. माझ्या सर्वात मोठ्या मुलीनं डीजेनं मला पाठवलेली स्क्रिप्ट वाचली. ती रडली... मी तिला विचारले की ती का रडली आणि ती म्हणाली, ''भाऊ आणि बहिणीची गोष्ट तिच्यासाठी खरी होती आणि ती भावनिक आहे.''

विन डिझेल आणि दीपिका पदुकोणचं वर्कफ्रंट : याशिवाय पुढं त्यानं लिहिलं, ''माझ्या मुलीला रडवणारा चित्रपट मी बनवू शकलो तर, माझ्या बहिणीची भूमिका कोण करू शकते अशा प्रश्न माझा तुम्हाला पडला असेल. माझ्या मुलीनं मला जेनिफर लॉरेन्स हे नाव सुचवलं आहे. तुम्हाला काय वाटते?'' विन डिझेल त्याच्या 'फास्ट अँड फ्युरियस' या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. तो शेवटी गेल्या वर्षी 'फास्ट एक्स'मध्ये दिसला होता. दरम्यान दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'फायटर' चित्रपटामध्ये हृतिक रोशनबरोबर दिसली होती. पुढं ती 'सिंघम अगेन', 'कल्कि 2898 - एडी', या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'मगधीरा', 'रंगस्थलम' आणि 'आरआरआर' : राम चरणच्या उत्तुंग कारकिर्दीचा चढता आलेख - Ram Charan Birthday
  2. मुनावर फारुकीविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अवैध पदार्थ सेवन करताना घेतलं ताब्यात - Munawar faruqui
  3. "तू कधी 'दिशा' बदलू नकोस" टायगर श्रॉफला अक्षय कुमारचा अनमोल सल्ला - Akshay Kumar advice to Tiger Shroff

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.