ETV Bharat / entertainment

शौर्य आणि बलिदानाचं महाकाव्य 'छत्रपती संभाजी' चित्रपट २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात - छत्रपती संभाजी

Historical film Chhatrapati Sambhaji : छत्रपती संभीजी महाराजांच्या अतुलनिय पराक्रम आणि बलिदानाची गाथा 'छत्रपती संभाजी' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. भारतातील अनेक भाषांसह हा चित्रपट इंग्रजी भाषेतही रिलीजसाठी सज्ज झालाय. येत्या 2 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईल.

Historical film Chhatrapati Sambhaji
'छत्रपती संभाजी' चित्रपट चित्रपटातील दृष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 4:37 PM IST

मुंबई - Historical film Chhatrapati Sambhaji :छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. संकटाला निर्भीडपणे सामोरे जात पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

राजकारण, मुत्सद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले छत्रपती संभाजी महाराज रणांगणावरचे शेर होते. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास 'छत्रपती संभाजी' या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे. राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढवले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य साम्राज्याचा विस्तार केला. प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , दिवंगत आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार 'छत्रपती संभाजी' चित्रपटात आहेत.

Historical film Chhatrapati Sambhaji
'छत्रपती संभाजी' चित्रपट चित्रपटातील दृष्य

चित्रपटाला साजेशी ६ गाणी चित्रपटात असून अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला दिले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांचे आहे. 'छत्रपती संभाजी' या ऐतिहासिक तथ्यांवर आधारित चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा सुरेश चिखले यांनी लिहिली आहे. तर, छायांकन सुरेश देशमाने आणि संकलन भरत भाई यांनी केले आहे. कला अनिल वठ यांची आहे. यातील साहसदृश्ये पी. सतीश यांची आहेत.

'छत्रपती संभाजी' चित्रपट २ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -

  1. धर्मेंद्रची नात निकिता चौधरी थाटामाटात अडकली लग्नबेडीत; फोटो व्हायरल
  2. 'हिरो बाप' जॅकी श्रॉफला टायगर आणि कृष्णाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. कार्तिक आर्यनचे वर्षभरानंतर तोंडगोड, 'चंदू चॅम्पियन'च्या पॅकअपनंतर केला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.