ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुनने मुलगा अल्लू अयानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लिहिली सुंदर पोस्ट - Allu Ayaan birthday - ALLU AYAAN BIRTHDAY

Allu Ayaan birthday : अल्लू अर्जुननं आपला मुलगा अयानवर वाढदिवसानिमित्त प्रेम शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अयान अल्लु आज 11 वर्षाचा होत असून त्याची आई अल्लू स्नेहा रेड्डी हिनं मुलासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Allu Ayaan birthday
अल्लू अर्जुनने मुलगा अल्लू अयान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 11:13 AM IST

Updated : Apr 3, 2024, 12:06 PM IST

मुंबई - Allu Ayaan birthday : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन यानं त्याचा मुलगा अयानचा वाढदिवस साजरा केला. त्यानं मुलासाठी एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. "आपल्या आयुष्यातलं प्रेम", असा उल्लेख अल्लू अर्जुननं मुलासाठी केला आहे. अयान अल्लु 3 एप्रिल 2024 रोजी 11 वर्षाचा झाला आहे.

विमान प्रवासात बर्थडे बॉय अयान अल्लु आरामात संगीत ऐकण्यात मग्न असलेला फोटो अल्लु अर्जुननं इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. "माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! अल्लू अयान 10 वर्षे पूर्ण करत आहे," असं त्यानं फोटोसह लिहिले आहे. केवळ अल्लु अर्जुननेच नाही तर हा फोटो त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी हिनेही शेअर केला आहे. यात ती मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साही असल्याचं दिसतं.

Allu Ayaan birthday
अल्लू अर्जुनने मुलगा अल्लू अयान

अल्लू अर्जुन सध्या कुटुंबासोबत सुट्टी घालवत आहे. त्याने त्याच्या शूटिंगच्या कामामधून ब्रेक घेतला आहे आणि त्याचा मुलगा अयान, मुलगी अर्हा आणि पत्नी स्नेहा रेड्डी त्याच्या बरोबर सहलीचा आनंद घेत आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ अल्लु अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहाच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

अल्लु अर्जुन येत्या 8 एप्रिल रोजी 42 वर्षांचा होणार आहे. त्यापूर्वीच त्याला अनेक बर्थडे गिफ्ट्स मिळत आहेत. दुबईच्या मादाम तुस्साद संग्रहालयात त्याचा मेणाचा पुतळा उभा करण्यात आला आहे. त्याचे लॉन्चिंग अल्लु अर्जुनच्या उपस्थितीत करण्यात आलं. त्याचा 'पुष्पा द रुल' चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन १५ ऑगस्ट २०२४ रोजी होईल. पण त्या आधी निर्मात्यांनी अल्लु अर्जुनच्या वाढदिवशी चित्रपटाचा नवा टीझर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. त्याच्या चाहत्यांसाठी हा टीझर एक पर्वणी असेल. चाहते आता आगामी 'पुष्पा: द रुल' चित्रपटाची खूप आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' मध्ये अल्लु अर्जुन शिवाय रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा -

अल्लु अर्जुनच्या वाढदिवसाचे काऊंटडाऊन 'पुष्पा मास जत्रा'सह सुरू, निर्मांत्यांनी दिली नवी अपडेट - Pushpa 2 release preparations

वरुण धवनने शेअर केला 'बेबी जॉन' सेटवरील फोटो, शूटिंगचा '७० वा दिवस' असल्याचा केला खुलासा - Varun Dhawan next movie

अमिताभ बच्चनला आठवला धोकादायक स्टंट्स, ना सुरक्षा कवच ना व्हिएफएक्स - Amitabh Bachchan dangerous stunts

Last Updated : Apr 3, 2024, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.