नवी दिल्ली Grammy Awards 2024 : संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित समजला जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचा कार्यक्रम सोमवारी ( 4 फेब्रुवारी 2024) आयोजित होणार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर पुरस्कार हा अभिनय आणि चित्रपट जगतातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो, त्याचप्रमाणे ग्रॅमी पुरस्कार हा संगीतविश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. जगभरातील कलाकारांचं कार्यांची चाचपणी करुन जगभरातील संगीतकारांपैकी एकाची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. हे पुरस्कार विविध श्रेणींमध्ये वितरित केले जातात. 2024 हे वर्ष या पुरस्कार सोहळ्याचं 66 वे वर्ष आहे. भारतीय वेळेनुसार या पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी 8 वाजता सुरू होईल. या पुरस्काराचं लाईव्ह प्रक्षेपण युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.
कोण होस्ट करत आहे कार्यक्रम : यावेळी या मेगा इव्हेंटचं सूत्रसंचालन दक्षिण अमेरिकन कॉमेडियन लेखक ट्रेव्हर नोह करत आहेत. याआधी त्यानं सलग तीन वेळा हा शो होस्ट केलाय. याशिवाय त्याचीही दुसऱ्यांदा या पुरस्कारासाठी निवड झालीय. त्याला सर्वोत्कृष्ट कॉमेडी अल्बमसाठी नामांकन मिळालंय. याशिवाय अलीकडेच त्यानं आपल्या नावावर एमी अवॉर्डही जिंकलाय.
ग्रॅमी पुरस्कारात भारतही मागं नाही : भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. भारतीय संगीत देखील जगभरातील अनेकांना खूप आवडतं. आत्तापर्यंत अनेक भारतीयांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकलाय. यात पंडित रविशंकर, गुलजार, ए आर रहमान, रिकी केज, झुबिन मेहता आणि फाल्गुनी शाह यांच्यासह अनेक कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही गीतलेखनाकरिता नामांकन मिळालंय. ॲबडन्स इन मिलेट्स या गाण्यातील गीतलेखनासाठी त्यांना नामांकन मिळालंय. या गाण्याला फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांनी संगीत दिलंय.
हेही वाचा :
- Grammy award 2024 : पंतप्रधान मोदी झळकलेल्या 'अबंडन्स इन मिलेट्स' गाण्याला ग्रॅमी पुरस्कार 2024 साठी नामांकन
- ग्रॅमी पुरस्कार 2023 : 'कार्डी बी'ने गौरव गुप्ता निर्मित काऊचर केला परिधान; या लूकने घेतले सगळ्यांचे लक्ष वेधून
- Grammy Awards 2022 : ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये ट्रेव्हर नोह लेव्हर बर्टनने स्मिथ - रॉकची घेतली मजा