मुंबई - Thalapathy Vijay : थलपथी विजय स्टारर 'गोट' हा सध्या खूप चर्चेत आहे. तामिळनाडू सरकारनं सकाळी रिलीज होत असलेल्या चित्रपटाच्या शोवर बंदी घातली आहे. त्यामुळे या चित्रपटाचं प्रदर्शन सकाळी 9 वाजल्यापासूनच सुरू होऊ शकतं. गेल्यावेळी, पोंगल 2023 दरम्यान बॉक्स ऑफिसवर एकत्रित प्रदर्शित झालेल्या अजितचा 'थुनिवु' आणि विजयचा 'वारिसु' यांना राज्यात मॉर्निंग शोसाठी परवानगी देण्यात आली होती. आता अलीकडे थलपथी विजयच्या 'गोट'च्या मॉर्निंग शोसाठी परवानगी मागण्यात आली आहे. दरम्यान 'गोट' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला परवानगी मिळावी, यासाठी सरकारला याचिका सादर करण्यात आली आहे.
'गोट' तामिळनाडू ऐवजी बाकी राज्यात रिलीज : आता तामिळनाडू थिएटर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष तिरुपूर सुब्रमण्यम यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की, "अद्याप कोणतीही परवानगी मिळालेली नाही आणि चित्रपटगृहांमध्ये विशेष स्क्रिनिंगसाठी कोणतीही तिकिटे विकली गेली नाहीत. 'गोट' चित्रपटाच्या मॉर्निंग शोसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. आता 'गोट' हा चित्रपट प्रथम तामिळनाडू व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये प्रदर्शित होईल. दरम्यान 'गोट' हा रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. ' गोट'चा आतापर्यंत कोणताही भव्य प्री-रिलीज कार्यक्रम झालेला नाही.
'गोट' 'या 'दिवशी होईल प्रदर्शित : थलपथी विजय स्टारर 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' (GOAT) हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. व्यंकट प्रभू यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात थलपथी विजय व्यतिरिक्त प्रशांत, प्रभुदेवा, मोहन आणि जयराम यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीच्या मदतीनं विजयकांत एका छोट्या भूमिकेत दिसू शकतो. दरम्यान विजयचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. हा विजयचा शेवटचा चित्रपट असल्याचं बोललं जात आहे. कारण यानंतर तो त्याची राजकीय पार्टी 'तमिलगा वेत्री कझगम' सांभाळणार आहे. दरम्यान विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी तो 'लियो' या चित्रपटामध्ये दिसला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती.
हेही वाचा :
- थलपथी विजय स्टारर 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम'चं यूकेमध्ये होईल द लाईट थिएटरमध्ये विशेष स्क्रीनिंग - thalapathy vijay film
- नीट परीक्षेवरील लोकांचा विश्वास उडाला- अभिनेता थलपतीनं केंद्र सरकारला 'ही' केली विनंती - ACTOR VIJAY on NEET
- राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल थलपती विजयनं केलं अभिनंदन - Vijay congratulated Rahul Gandhi