मुंबई Anant Ambani Radhika Merchant : अंबानी कुटुंबानं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न मोठ्या थाटात केल्यानंतर, आता अँटिलियामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अंबानी कुटुंबात एक भव्य सोहळा साजरा केला जात आहे. आज देशात सर्वत्र गणपती बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. दरम्यान अंबानी कुटुंबात आता पार्टीसारखं वातावरण आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाच्या भव्य स्वागतात मुकेश अंबानीनं काही कमी ठेवलेली नाही. आता सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये अंबानी कुटुंबातील सदस्य खूप खुश असल्याचे दिसत आहे. दरम्यान नुकतेच अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशननं लालाबागच्या राजाला 20 किलोचा सोन्याचं मुकूट चढवला आहे. याची किंमत जवळपास 15 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा व्हिडिओ व्हायरल : तसेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट संपूर्ण कुटुंबासह अँटिलियाचा राजा यांचं भव्य स्वागत करताना दिसत आहेत. पिवळ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या मिनी ट्रकमध्ये गणेशाची मूर्ती अँटिलियामध्ये आणण्यात येत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. अंबानी कुटुंबातील गणपती बाप्पाची खास झलक सर्वांसमोर आली आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं स्वागत खूप विशेष पद्धतीनं करण्यात आलं आहे. यादरम्यान राधिका मर्चंटनं लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. दुसरीकडं अनंत अंबानीनं केशरी रंगाचा पोशाख घातला होता. मुकेश अंबानी आणि ईशा अंबानी यांचीही झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली.
अनंत आणि राधिकानं घेतलं बाप्पाचं दर्शन : व्हिडिओत मुकेश अंबानी आणि ईशा अंबानी यावेळी मुलांना कडेवर घेऊन असल्याचं दिसलं. दरम्यान नवविवाहित जोडपं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी बाप्पाचं विशेष दर्शन घेतलं. व्हायरल होत असलल्या व्हिडिओत नीता अंबानी, श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांची झलक दिसली नाही. दरवर्षीप्रमाणं यंदाही विसर्जनाच्या आधी बॉलिवूडमधील अनेक स्टार्स बाप्पाच्या दर्शनला अँटिलियामध्ये येतील.
हेही वाचा :
- 'अंबानींच्या लग्नात बॉम्ब...' सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं उडाली खळबळ, मुंबई पोलीस सतर्क - Bomb Threat in Ambani Wedding
- अनंत-राधिका यांचं हनिमून डेस्टिनेशन ठरलं! पण प्लॅन... - Anant Ambani and Radhika Merchant
- अंबानीच्या विवाहाचा बीकेसीतील कर्मचाऱ्यांना फटका, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' - ANANT RADHIKA WEDDING