ETV Bharat / entertainment

गणपतीच्या मूर्तींसाठी 'भाईजान'नं सांगितली महत्त्वाची गोष्ट, चाहत्यांना केलं आवाहन - Ganesh Chaturthi - GANESH CHATURTHI

Salman Khan on Ganesh Festival: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननं गेल्या बुधवारी गणेश चतुर्थी पर्यावरणपूरक उत्सव कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमातून 'भाईजान'चे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

Salman Khan on Ganesh Festival
गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सलमान खानचं आवाहन (सलमान खान (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 29, 2024, 10:27 AM IST

Updated : Aug 29, 2024, 11:09 AM IST

मुंबई Salman Khan on Ganesh Festival : गणेशोत्सव देशभरात अगदी जोशात साजरा केला जातो. मुंबईसह महाराष्ट्रात तर हा सर्वात मोठा सण आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत वातावरणात मांगल्याची अनुभूती येत असते. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना करतात आणि काही दिवस भक्तिभावाने गणरायाची सेवा केल्यानंतर गणेश मुर्तीचं विसर्जन करतात. सलमान खानचं कुटुंबही हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतं. सलमाननं यंदा गणपती बाप्पांबाबत लोकांना आवाहन केलं आहे. विसर्जनानंतर मुर्तीचे अवशेष विखुरलेले राहू नयेत यासाठी प्रत्येकानं घरी इको-फ्रेंडली गणपती आणण्याचं आवाहन त्यानं कार्यक्रमात केलं.

सलमान खानचं लोकांना आवाहन : पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली गणेश मूर्तीं ही निसर्गासाठी देखील योग्य असते, हे सर्वांना माहीत आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सलमान खान स्टेजवरुन सर्वांना संबोधित करत म्हणतो, "इको-फ्रेंडली गणेश आणा आणि त्याचे विसर्जन तुमच्या सोसायटीत, तुमच्या इमारतीत, घरात करा. जेणेकरुन मूर्ती पूर्णपणे विरघळेल. यानंतर त्यानं पुढं म्हटलं, "किती वाईट वाटतंय की तुम्ही लोक पीओपीचा गणपती बनवता आणि मग विसर्जन करता. यानंतर समुद्राजवळ गेलात तर बरं वाटतं का? अर्धा गणेश तिथं पडलेला दिसतो. जेव्हा तुम्ही तिथं जाता, तेव्हा तुमचा पाय त्यांना स्पर्श करतो आणि ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे इको फ्रेंडली गणपती घरी आणा."

सलमान खाननं छोट्या चाहत्याला मारली मीठी : एका व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान खान स्टेजवर उभा असल्याचं दिसत आहे. सलमानजवळ एक मुलगा येतो. हा मुलगा त्याच्यापर्यंत पोहोचताच सलमान त्याला प्रेमाने मिठी मारतो. एका छोट्या चाहत्यानं त्याला एक स्केच दिलं. हे स्केच सलमानचं होतं. सलमाननं आनंदानं त्या स्केचवर सही केली. त्यानंतर, तो मुलगा त्याच्या पायांना स्पर्श करण्यासाठी वाकला, यावर सलमाननं स्टेज सोडण्यापूर्वी त्याला पुन्हा मिठी मारली. 'भाईजान'च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो साजिद नाडियादवालाचा आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2025च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुनील शेट्टी, रश्मिका मंदान्ना हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'स्त्री 2'मधला 'सरकटा' सुनील कुमार होणार 'बिग बॉस 18'चा स्पर्धक - Stree 2 Sarkata
  2. सलमान खाननं बहीण अर्पिता खान शर्माचा वाढदिवस कथित गर्लफ्रेंट युलिया वंतूरबरोबर केला साजरा - Arpita Khan
  3. 'लॉरेन्स बिश्नोईला मला आणि माझ्या कुटुंबाला मारायचं होतं', सलमान खाननं केलं विधान... - SALMAN KHAN and Bishnoi Gang

Last Updated : Aug 29, 2024, 11:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.