ETV Bharat / entertainment

FTII विद्यार्थ्यांच्या 'सनफ्लॉवर' चित्रपटानं जिंकलं 'कान्स 2024' मधील सर्वोच्च पारितोषिक - CANNES FILM FESTIVAL 2024 - CANNES FILM FESTIVAL 2024

FTII च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला चिदानंद एस नाईक दिग्दर्शित 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो' या चित्रपटाला सिनेफ येथे प्रतिष्ठित प्रथम पारितोषिक मिळालं आहे. भारतानं ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवात हा मोठा विजय साजरा केला. कन्नड लोककथेवर आधारित असलेल्या या लघुचित्रपटाला यश मिळाल्यानं दिग्दर्शकांसह इतर टीमचं खूप कौतुक होत आहे.

FTII Student Film Sunflowers
चिदानंद एस नाईक दिग्दर्शित सनफ्लॉवर्स (chidananda_s_naik Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 11:16 AM IST

कान्स - 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवात गुरुवारचा दिवस भारतासाठी खास ठरला. चिदानंद एस नाईक यांच्या 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो' या लघुपटाला 'ला सिनेफ'मध्ये सर्वोच्च पारितोषिक मिळालं आहे. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या टेलिव्हिजन विभागातील एका वर्षाच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी म्हैसूरच्या फिजिशियन असलेल्या चित्रपट निर्मात्याने हा प्रकल्प हाती घेतला होता. हा चित्रपट कन्नड लोककथेवर आधारित कोंबडा चोरणाऱ्या वृद्ध स्त्रीवर केंद्रित आहे.

बातमी शेअर करताना FTII ने त्यांच्या अधिकृत X हँडलवर लिहिलंय: "'FTII ने भारतासाठी मोठा सन्मान आणला आहे. आमच्या विद्यार्थ्यांचा 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो हा चित्रपट 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ला सिनेफ पुरस्काराचा विजेता ठरला आहे. दिग्दर्शक चिदानंद एस नाईक यानं 23 मे 2024 रोजी कान्स येथे हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवला आहे."

या वर्षी 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या फिल्म इन्स्टीट्यूटच्या दिग्दर्शन अभ्यासक्रमातील एक नव्हे तर तीन प्रतिभावान माजी विद्यार्थ्यांचे काम पाहायला मिळालं. त्यांच्या निर्मितीपैकी एक असलेल्या 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' या चार FTII विद्यार्थ्यांनी एक लघुपट 'ला सिनेफ' स्पर्धात्मक विभागात झळकला होता. चिदानंद एस नाईक दिग्दर्शित हा लघुपट कान्स 2024 मध्ये ला सिनेफ विभागातील स्पर्धेत बक्षिसांसाठी इतर 17 शॉर्ट्सशी स्पर्धा केली आणि वेजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

या चित्रपटात एका वृद्ध महिलेची कथा आहे जी कोंबडा चोरून आपल्या गावात एक संकट ओढवून घेते आणि तिच्या कुटुंबाला वनवासाला जाण्यास भाग पाडते. कान्स फिल्म फेस्टीव्हलची खडतर स्पर्धा लक्षात घेता FTII विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा पराक्रम आहे. जगभरातील फिल्म इन्स्टीट्यूटमधून 2,000 हून अधिक प्रवेशिका सबमिट केल्या गेल्या होत्या.

मानसी माहेश्वरी दिग्दर्शित 'बनीहूड' या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाने 'ला सिनेफ' स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. NIFT दिल्लीची माजी विद्यार्थिनी आणि मेरठची रहिवासी असलेल्या माहेश्वरी यांनी युनायटेड किंगडममधील नॅशनल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना हा चित्रपट बनवला होता. शिवाय, थेस्सालोनिकी, ग्रीसच्या अरिस्टॉटल युनिव्हर्सिटीच्या निकोस कोलिओकोस दिग्दर्शित 'द केओस शी लेफ्ट बिहाइंड' आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या आसिया सेगालोविच दिग्दर्शित 'आउट ऑफ द वाइडो थ्रू द वॉल' यांनी दुसरं स्थान मिळवलं आहे.

हेही वाचा -

  1. मनोज बाजपेयीचा 100 वा चित्रपट : कुटुंबाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारा 'भैय्या जी' - Bhaiyya Ji Movie Promotion
  2. द्विभाषिक 'मल्हार' चित्रपटातून उलगडणार नात्यांच्या विविध छटा! - Malhar movie
  3. तृप्ती दिमरीनं 'पुष्पा 2'मध्ये सामंथा रुथ प्रभूची घेतली जागा, अल्लू अर्जुनबरोबर करणार डान्स नंबर - tripti dimri and pushpa 2

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.