मुंबई - Swara Bhasker: मल्याळम चित्रपट उद्योगातील अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश करणाऱ्या न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालावर आता अभिनेत्री स्वरा भास्करनं प्रतिक्रिया दिली आहे. समितीमध्ये समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीनं स्वरा भास्करला खूप प्रभावित केलं आहे. स्वरानं महिलांना पाठिंबा दिल्याबद्दल वुमन इन सिनेमा कलेक्टिव्हचे (WCC) मनापासून आभार मानलं आहे. चित्रपटसृष्टीतील महिलांवरील अत्याचार आणि शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या प्रयत्नांचंही स्वरानं कौतुक केलंय. या संदर्भात तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिनं तिच्याबरोबर झालेला भयानक अनुभवही शेअर केला आहे.
स्वरा भास्करची प्रतिक्रिया : स्वरानं तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, न्यायमूर्ती हेमा समितीचा अहवाल वाचल्यानंतर माझे मन पूर्णपणे तुटले आहे, मी दुःखी आहे कारण माझ्याबरोबर देखील असं घडलं आहे. अहवालात नमूद केलेल्या सर्व गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या नाहीत. यातील काही गोष्टी माझ्याशी संबंधित आहेत. इंडस्ट्रीत पुरुषवाद आहे. आता ही पितृसत्ता प्रस्थापित झाली आहे. अत्यंत विचारशील परिस्थिती आहे, प्रत्येक दिवशी निर्मिती होते, शूटिंग होते, पोस्ट-प्रॉडक्शनच्या दिवशीही काम चालू असते आणि पैसा खर्च होत असतो. कोणालाही कामात अडवणूक आवडत नाही. जर कुणी सत्य आणि हक्कासाठी आवाज उठवत असेल तर ते चालू ठेवणे अधिक सोयीचे आणि आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक झाले आहे.
मल्याळम फिल्म इंडस्ट्रीचं काळं सत्य : स्वरानं पुढं सांगितलं, "चित्रपटसृष्टी केवळ पितृसत्ताकच झालेली नाही तर तिचं स्वरुपही वेगळे बनले आहे. यशस्वी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना देवाचा दर्जा दिला गेला आहे. जर कोणी त्यांच्याविरोधात आवाज उठवला तर त्यांच्याबरोबर अप्रिय गोष्टी घडतात. जे गप्प बसतात त्यांचेच कौतुक केले जाते आणि त्यांना बक्षीसही मिळते. दरम्यान 19 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती हेमा समितीचा 296 पानी अहवाल सार्वजनिक करण्यात आला होता. यात अनेक अभिनेत्रींची साक्ष आणि धक्कादायक खुलाशांचा समावेश होता. या अहवालात कोणत्याही अभिनेत्यांचे आणि दिग्दर्शकांचे नाव समोर आले नसले तरी मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील हे काळं सत्य समोर आल्यानंतर संपूर्ण देशात याबद्दल चर्चा होत आहे.
हेही वाचा :